IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; रोहित शर्मा आयपीएलमधून घेणार माघार?

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्यानं दोन सामन्यांत विश्रांती घेतली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 26, 2020 09:18 PM2020-10-26T21:18:28+5:302020-10-26T21:38:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS : No Rohit Sharma In India's all 3 squads for Australia tour, That means he is out of IPL 2020 too? | IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; रोहित शर्मा आयपीएलमधून घेणार माघार?

IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; रोहित शर्मा आयपीएलमधून घेणार माघार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा झाली. निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली. नवदीप सैनीला तीनही संघात स्थान देण्यात आले असून दुखापतग्रस्त रोहित शर्माचे नाव निवड केलेल्या एकाही संघात नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माची निवड न होणे, म्हणजे त्याची दुखापत गंभीर असून तो आयपीएलमधूनही माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्काच असेल.

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला नाही.आगामी ऑस्ट्रेलिया दौराही लक्षात घेता मॅनेजमेंट रोहितवर अधिक ताण देऊ इच्छित नाही. रोहितची दुखापत गंभीर नसली तरी मॅनेजमेंट कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, परंतु आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातच स्थान न दिल्यानं तो IPL 2020 मधून माघार घेण्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स, बीसीसीआय आणि रोहित यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.



ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी.

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

या दौऱ्यासाठी चार अतिरिक्त गोलंदाज - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी नटराजन

रोहित शर्मा व इशांत शर्मा यांच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकिय टीम लक्ष ठेवून  

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातील हायलाईट्स
- रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे संघात निवडले नाही
- सूर्यकुमार यादव याला चांगल्या खेळीनंतरही संधी नाही
- मोहम्मद सिराजला कसोटी संघात संधी
- वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची संधी
- लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन
- मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे उपकर्णधारपद 
 

Web Title: IND vs AUS : No Rohit Sharma In India's all 3 squads for Australia tour, That means he is out of IPL 2020 too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.