IND vs AUS Mere Ko Mere Gharwale Bhi Bol Rahe Hai Why Shubman Gill Gave This Reply :ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून शुबमन गिलच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाच्या वनडेतील नव्या पर्वाची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन सामन्यातील पराभवासह भारतीय संघाने मालिका गमावली. पण रोहित-विराट जोडीनं अखेरच्या वनडे सामन्यात धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश करत शेवट गोड केला. वनडे कॅप्टन्सीतील पहिल्या विजयानंतर शुबमन गिलनं माजी कर्णधार रोहित शर्मासहविराट कोहलीसंदर्भात मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर हर्षित राणाच्या गोलंदाजीवरही तो भरभरून बोलला. पण मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-विराट कोहलीसंदर्भात काय म्हणाला गिल?
सिडनीच्या मैदानातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार विजयानंतर भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने मैदानात नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची मदत होते, ही गोष्ट बोलून दाखली. सिडनीच्या मैदानातील त्यांच्या फलंदाजीवर बोलताना तो म्हणाला की, गेल्या अनेक वर्षांपासून ते (रोहित आणि विराट) सर्वोत्तम कामगिरी करत आले आहेत. त्यांना असे फलंदाजी करताना एक वेगळाच आनंद मिळतो.
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
हर्षित राणासह या गोलंदाजाचं केलं खास कौतुक
तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात हर्षित राणा याने जबरदस्त गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचं कंबरडे मोडले. या युवा गोलंदाजाचं कौतुक करताना शुबमन गिल म्हणाला की, मधल्या षटकात हर्षित राणासारखा जलगदती गोलंदाज संघात असणं फायद्याचं ठरते. याशिवाय गिलनं कुलदीप यादवच्या कामगिरीवरही त्याने समाधान व्यक्त केलं. कुलदीपनं फक्त एक विकेट घेतली. पण त्याने मधल्या षटकात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दमवलं, असे गिल म्हणाला.
'तो' प्रश्न अन् गिलला आठवली घरची मंडळी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत एकाही सामन्यात नाणेफेकीचा कौल शुबमन गिलच्या बाजूनं लागला नाही. परिणामी सिडनीच्या मैदानात टीम इंडियाने सलग १८ व्या वेळी टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत या चर्चित मुद्यावरुन एका पत्रकाराने शुबमन गिलला प्रश्न विचारला. टॉस प्रॅक्टिससंदर्भात कोच गौतम गंभीर यांच्यासोबत काही चर्चा होते का? असा मजेशीर प्रश्न गिलला विचारण्यात आला होता. यावर गिल म्हणाला की, "आता घरची मंडळीही मला यावरून काही ना काही बोलू लागली आहेत." याचा अर्थ भारतीय युवा कर्णधाराला टॉसवरून घरच्या मंडळींचे टोमणेही ऐकायला लागत आहेत, हेच त्याच्या वक्तव्यातून समोर येते.
Web Summary : Shubman Gill lauded Rohit and Virat's batting after India's win. He also praised Harshit Rana's bowling. Gill humorously mentioned facing family teasing due to his repeated toss losses in the series against Australia.
Web Summary : शुभमन गिल ने भारत की जीत के बाद रोहित और विराट की बल्लेबाजी की सराहना की। उन्होंने हर्षित राणा की गेंदबाजी की भी प्रशंसा की। गिल ने मजाक में कहा कि ऑस्ट्रेलिया के खिलाफ श्रृंखला में लगातार टॉस हारने के कारण उन्हें परिवार से ताने सुनने को मिल रहे हैं।