Siraj-Head Controversy: अॅडिलेड कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड यांच्यात स्लेजिंगचा खेळ पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या गोष्टीची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर ICC नं दोघांवरही कारवाईही केलीये. ऑस्ट्रेलियन खेळाडूला हातवारे करुन तंबूचा रस्ता दाखवल्या प्रकरणी सिराजवर दंडात्मक कारवाई झाली. मॅच फीतून २० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. दुसरीकडे ट्रॅविस हेडला डिमेरिट गुणांसह ताकीद दिली गेली. पण ही गोष्ट भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला पटलेली नाही. आयसीसीनं ही गोष्ट कारवाई करण्याइतपत मनावर घ्यायला नको होती, असे मत त्याने मांडले आहे.
काय म्हणाला भज्जी?
सिराज-हेड यांच्यातील भांडणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) झालेल्या कारवाईनंतर हरभजन सिंगनं यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात भज्जी म्हणाला की, "मला वाटतं की, आयसीसी खेळाडूंसंदर्भात अधिकच कठोर भूमिका घेत आहे. मैदानात अशा घटना घडतच असतात. या गोष्टी बाजूला ठेवून पुढे जायला पाहिजे. भांडल्यावर दोघांच्या पॅचप झाल्याचा सीनही पाहायला मिळाला. पण आयसीसीनं त्यांच्यावर कारवाई केलीच. आता झालं ते झालं. वाद बाजूला सोडून आता क्रिकेटवर फोकस करुयात."
आधी सिराज-हेड यांच्यात चांगलचं वाजलं; मग मैदानातच दोघांच्यातील गोडवाही दिसला, पण...