Siraj-Head Controversy: अॅडिलेड कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड यांच्यात स्लेजिंगचा खेळ पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या गोष्टीची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर ICC नं दोघांवरही कारवाईही केलीये. ऑस्ट्रेलियन खेळाडूला हातवारे करुन तंबूचा रस्ता दाखवल्या प्रकरणी सिराजवर दंडात्मक कारवाई झाली. मॅच फीतून २० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. दुसरीकडे ट्रॅविस हेडला डिमेरिट गुणांसह ताकीद दिली गेली. पण ही गोष्ट भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला पटलेली नाही. आयसीसीनं ही गोष्ट कारवाई करण्याइतपत मनावर घ्यायला नको होती, असे मत त्याने मांडले आहे.
काय म्हणाला भज्जी?
सिराज-हेड यांच्यातील भांडणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) झालेल्या कारवाईनंतर हरभजन सिंगनं यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात भज्जी म्हणाला की, "मला वाटतं की, आयसीसी खेळाडूंसंदर्भात अधिकच कठोर भूमिका घेत आहे. मैदानात अशा घटना घडतच असतात. या गोष्टी बाजूला ठेवून पुढे जायला पाहिजे. भांडल्यावर दोघांच्या पॅचप झाल्याचा सीनही पाहायला मिळाला. पण आयसीसीनं त्यांच्यावर कारवाई केलीच. आता झालं ते झालं. वाद बाजूला सोडून आता क्रिकेटवर फोकस करुयात."
आधी सिराज-हेड यांच्यात चांगलचं वाजलं; मग मैदानातच दोघांच्यातील गोडवाही दिसला, पण...
अॅडिलेड कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ट्रॅविस हेडनं १४१ चेंडूत १४० धावांची दमदार इनिंग खेळली. या सामन्यात हेडनं दिवस रात्र कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्याच्या विक्रमी खेळीला सिराजनं ब्रेक लावला. ट्रॅविस हेड क्लीन बोल्ड झाल्यावर सिराजनं खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. त्यानंतर सिराज-हेड यांच्यात स्लेजिंगचा खेळ पाहायला मिळाला. दोघांच्या मैदानात वाजलेलं हे गाणं चांगलचं गाजलं. त्यानंतर सिराज बॅटिंगला आल्यावर दोघांच्यात गोडवा दाखवणारा सीनही क्रिकेट चाहत्यांनी पाहिला. पण चुकीला माफी नाही, म्हणत आससीसीनं दोघांवरही कारवाई केल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IND vs AUS Harbhajan Singh Unhappy ICC Punishment Of Mohammed Siraj And Travis Head Controversy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.