Join us

तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन

हर्षित राणाला कुणी केलं होतं ट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:34 IST

Open in App

Gautam Gambhir Slams Kris Srikanth over Harshit Rana Trolling : टीम इंडियानं दिल्लीचं मैदान मारल्यावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर रोखठोक मत मांडले. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड झालेल्या हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलेच सुनावले. हर्षित राणाचे बाबा काही निवड समितीची अध्यक्ष नाहीत, २३ वर्षांच्या पोराला टार्गेट करुन युट्युब चॅनेल चालवणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा आशयाच्या शब्दांत गंभीर यांनी युवा क्रिकेटरचा बचावासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. नेमकं गौतम गंभीर काय म्हणाले? त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हर्षित राणाला कुणी केलं होतं ट्रोल?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यावर भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीची माजी अध्यक्ष कृष्णमाचारी यांनी हर्षित राणाच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. हर्षित राणा हा  गौतम गंभीरचा चमचा आहे, या एकमेव गोष्टीमुळे तो संघात आहे, अशा आशयाच्या शब्दांत श्रीकांत यांनी २३ वर्षीय गोलंदाजावर निशाणा साधला होता. त्यांच्याशिवाय आर. अश्विन यानेही हर्षित राणाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले होते. या दोघांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून युवा गोलंदाजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत निवड खटकणारी असल्याचे म्हटले होते.

VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

युट्युब चॅनेल चालवण्यासाठी २३ वर्षीय खेळाडूला ट्रोल करणं लाजिरवाणं

हर्षित राणाचा बचाव करताना गौतम गंभीर म्हणाले की, आपला युट्यूब चॅनेल चालवण्यासाठी २३ वर्षीय खेळाडूवर निशाणा साधणं लाजिरवाणे आहे. टीका करायची तर माझ्यावर करा. मी त्याचा सामना करू शकतो. पण २३ वर्षांच्या खेळाडूला लक्ष्य करणं चुकीचं आहे.  

तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन   

गौतम गंभीर पुढे म्हणाले की, त्याचे (हर्षित राणा) वडील निवडकर्ता नाहीत. त्याने आपल्यातील क्षमता दाखवून देत टीम इंडियात स्थान मिळवले आहे. उगाच युवा खेळाडूवर निशाणा साधू नका. गंभीर यांचे हे वक्तव्य बीसीसीआयच्या निवडकर्त्याच्या लेकाची भारतीय संघात वशिल्याने एन्ट्री झाली होती का? असा प्रश्न निर्माण करणारे आहे. यामागचं कारण ज्यावेळी के श्रीकांत बीसीसीआय निवड समितीची अध्यक्ष होते त्यावेळी त्यांचा मुलगा अनिरुद्ध याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारत 'अ' संघात निवड झाली होती. गंभीर यांनी राणाचे वडील निवडकर्ते नाहीत असं म्हणत माजी निवडकर्त्यांनाच टोला मारल्यासारखे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gambhir defends Harshit Rana, slams Srikanth's nepotism claims: The connection.

Web Summary : Gautam Gambhir strongly defended Harshit Rana after Kris Srikanth questioned his selection for the Australia tour, implying favoritism. Gambhir refuted these claims, highlighting Rana's merit and criticizing the targeting of young players for YouTube content, subtly referencing past selection controversies.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५गौतम गंभीरहर्षित राणाभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया