Join us

IND vs AUS : भारतीय खेळाडू तातडीने घरी गेला, आजच्या सामन्याला मुकला; सूर्यकुमारने सांगितले कारण

IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 18:37 IST

Open in App

IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजचा पाचवा सामना हा केवळ औपचारिक राहिला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताच्या यंग ब्रिगेडने मालिकेत दमदार खेळ केला आहे. ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांनी प्रभाव पाडला आहे. चौथ्या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरला ( Deepak Chahar) वैयक्तिक कारणामुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. चौथ्या सामन्यात ४४ धावांत २ विकेट्स त्याने घेतल्या होत्या.

भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते, परंतु तिसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने शतक झळकावताना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयाची आणि मालिकेत बरोबरीची संधी गमावली. भारताने विजयासह ट्वेंटी-२०त सर्वाधिक १३५ सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. आज भारताला आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा नाणेफेक जिंकली आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक चहर वैद्यकीय इमरजन्सीमुळे तातडीने घरी परतल्याचे सूर्यकुमार यादने सांगितले. त्याच्या जागी अर्शदीप सिंग खेळणार आहे.

भारत - यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग

  ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हीस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडेर्मोट, आरोन हार्डी, टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, बेन ड्वॉरशूईस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादीपक चहरसूर्यकुमार अशोक यादव