Join us

IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री

ऑस्ट्रेलियन संघ सेम गेम प्लॅनसह उतरला मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:38 IST

Open in App

IND vs AUS 5th T20I Tilak Varma Resting Rinku Singh India Playing 11 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव टॉस वेळी पुन्हा एकदा कमनशिबी ठरला. मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आधीच्या सामन्यात अनेक बदल करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तिलक वर्माच्या जागी रिंकू सिंहला संधी

दुसरीकडे भारतीय संघाने एक बदलासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तिलक वर्माच्या जागी भारतीय संघात रिंकू सिंह याला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाने सलग दोन विजयासह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.  ब्रिस्बेनच्या गाबाचं मैदान मारत  भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघासमोर मालिका बरोबरीत सोडवण्याचे चॅलेंज आहे.  

IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन 

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन 

मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेविड, जोश फिलिप, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वॉरशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अ‍ॅडम झाम्पा.

English
हिंदी सारांश
Web Title : Rinku Singh replaces Tilak Varma in India's playing eleven.

Web Summary : India faces Australia in the 5th T20I. Australia won the toss and chose to bowl. Rinku Singh replaces Tilak Varma in the Indian squad. India leads the series 2-1 and aims to win.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादवतिलक वर्मारिंकू सिंग