Join us

IND vs AUS 3rd Test: दे दणादण!! Umesh Yadav ने एकाच ओव्हरमध्ये मारले २ सिक्स... रोहित-विराटही झाले Shocked, पाहा Video

उमेशने स्पिनरला चांगलं चोपून काढलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:21 IST

Open in App

Umesh Yadav, IND vs AUS 3rd Test Live Updates: भारतीय संघाने पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. फिरकीला मदत करणाऱ्या पिचवर ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावात १०९ धावांवर गुंडाळले. मॅथ्यू कुन्हेमनच्या ५ विकेट्स आणि नॅथन लायनच्या ३ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. भारताकडून कोणताही फलंदाज तिशीही पार करू शकला नाही. रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत एकालाही मोठी खेळी करता आली नाही. पण उमेश यादवने मात्र चाहत्यांचे मनोरंजन केले. उमेश यादवची दे दणादण फटकेबाजी पाहून रोहित आणि विराटही अवाक् झाल्याचे दिसून आले.

उमेश यादवचे दोन धमाकेदार सिक्स

उमेश यादव मैदानात आला तेव्हा भारताची अवस्था फारच वाईट होती. ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सने भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात गपचूप अडकवले. त्यामुळेच भारतीय संघ शंभरी तरी गाठणार का? असा प्रश्न चाहत्यांना होता. त्याच वेळी उमेश यादवने फॅन्सचे मनोरंजन करत सामन्यात रंगत आणली. उमेश यादवने नॅथन लायनचा चांगलाच समाचार घेतला. त्याने लायनच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार खेचला. त्याच्या षटकारामुळे विराट कोहली आधी अवाक् झाला नि त्यानंतर त्याने जोरदार सेलिब्रेशन केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर उमेशने पुन्हा एक षटकार लगावला. त्याची ही फटकेबाजी पाहून कर्णधार रोहित शर्माही आ वासून बघू लागला.

--

--

--

दरम्यान, भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा १२ धावांवर तर शुबमन गिल २१ धावांवर माघारी परतला. चेतेश्वर पुजाराही १ धाव काढून त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रविंद्र जाडेजा स्वस्तात बाद झाला. श्रेयस अय्यरही शून्यावर गेला. विराट कोहली (२२) आणि केएस भरत (१७) यांनी झुंज दिली. पण त्याचा उपयोग झाला नाही. लंचनंतर अश्विन ३ धावांवर बाद झाला. उमेश यादवने १ चौकार आणि २ षटकार मारत १७ धावा केल्या. नंतर मोहम्मद सिराज धावबाद झाल्याने भारत १०९ धावाच करू शकला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App