Join us

IND vs AUS 3rd ODI Live Streaming: टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं चॅलेंज;कुठं पाहता येईल मॅच?

सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेसंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 00:02 IST

Open in App

 IND vs AUS 3rd ODI Live Streaming: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतीय वनडे क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून, कसोटीनंतर वनडे संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडून शुबमन गिलकडे आले. कोच गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली गिलने कसोटीत दमदार सुरुवात केली. मात्र, वनडे मालिकेतील पहिला शो अपेक्षेप्रमाणे फ्लॉप ठरला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मालिकेत गमावलेला संघ तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ‘व्हाइट वॉश’ची नामुष्की टाळण्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर उतरेल.

IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...

सामना कधी आणि कुठे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना शनिवारी, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना सकाळी ९ वाजता सुरु होईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार अर्धा तास आधी मैदानात उतरतील.

कसा पाहता येईल सामना?

मर्यादित षटकांच्या मालिकेचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह सामना पाहू शकतात. शिवाय, जिओ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.

कॅप्टन्सी बदलामुळे टीम इंडिया अडचणीत?

कसोटी सामन्यात भारतीय संघ अडखळला, तरीही टी-२० आणि वनडे स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी नोंदवली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम फायनलपर्यंत पोहोचली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलला वगळता, त्या मालिकेत भारताने सर्व सामने जिंकले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सात महिन्यांपूर्वी भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सर्व ५ सामने जिंकून फायनल जिंकले होते. तथापि, नेतृत्व बदलामध्ये घाईमुळे ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत काही अडचणी निर्माण झाल्या. याआधी २०२४ मध्येही रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका गमावली होती. आता दुसऱ्या द्विपक्षीय वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India vs Australia: India faces whitewash challenge; where to watch?

Web Summary : India aims to avoid a whitewash against Australia in the final ODI. The match will be held at Sydney Cricket Ground and will be broadcast on Star Sports and Jio Hotstar. Captaincy changes have seemingly impacted team performance.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा