Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS: आजचा निकाल ऑस्ट्रेलियासाठी 'इज्जत का सवाल'; टीम इंडियाकडे मोठा इतिहास रचण्याची संधी

भारतीय संघ वन डे मालिकेत २-०ने आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:48 IST

Open in App

Ind vs Aus 3rd ODI Live: भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात वन डे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाचा दारुण पराभव केला. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून त्यात भारतीय संघ विजयी झाला. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (२७ सप्टेंबर) राजकोटमध्ये सुरू आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर भारताला इतिहास रचण्याची संधी मिळेल. तसेच, भारताविरुद्धच्या कोणत्याही द्विपक्षीय वनडे मालिकेतील हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरू शकतो. जाणून घेऊया सविस्तर...

भारत प्रथमच ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप करू शकतो!

भारताने जर ऑस्ट्रेलियन संघाला क्लीन स्वीप दिली तर क्रिकेटच्या इतिहासात हा एक मोठा विक्रम ठरेल. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, भारतीय संघ २ किंवा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीपसह पराभूत करेल. १९८४ पासून आतापर्यंत भारताने २ किंवा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत कधीही ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप केलेले नाही.

भारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकांची आकडेवारी

  • एकूण एकदिवसीय मालिका: १४
  • ऑस्ट्रेलिया जिंकला: ८
  • भारत जिंकला: ६

भारतात दोन्ही संघांमधली आमने-सामने मालिका

  • एकूण एकदिवसीय मालिका: ११
  • ऑस्ट्रेलिया जिंकला: ६
  • भारत जिंकला: ५
टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाभारत