IND vs AUS: सुपरकूल पुल!! शुबमन गिलने जागेवर उभं राहून मारला खणखणीत षटकार

Shubman Gill Six: गिलचा सिक्सर पाहून तुम्हीही म्हणाल झक्कास...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 03:19 PM2023-09-24T15:19:18+5:302023-09-24T15:20:10+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd ODI Live Updates Shubman Gill Six splendid Pull shot out of the park sixer watch Video | IND vs AUS: सुपरकूल पुल!! शुबमन गिलने जागेवर उभं राहून मारला खणखणीत षटकार

IND vs AUS: सुपरकूल पुल!! शुबमन गिलने जागेवर उभं राहून मारला खणखणीत षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill Six video, IND vs AUS 2nd ODI Live Updates: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले. ऋतुराज गायकवाडच्या साथीने शुबमन गिलने चांगली सुरूवात केली होती. गायकवाड बाद झाल्यावर श्रेयस अय्यरसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी केली. पावसाचा व्यत्यय आल्याने सामना थांबला. पण त्याआधी ९व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर गिलने तगडा षटकार खेचला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. ऋतुराज गायकवाडने २ चौकार मारले. पण ८ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने आल्या आल्या फटकेबाजीला सुरूवात केली. श्रेयसने चौकारांची आतषबाजी करण्यास सुरूवात करत झटपट धावांची तिशी ओलांडली. त्यानंतर हळूहळू पावसाची सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढत असताना सीन अबॉटने आखूड टप्प्यावर चेंडू टाकला. त्यावर गिलने अप्रतिम पुल शॉट लगावला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने कर्णधार बदलला असून पॅट कमिन्सला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर भारताच्या संघात प्रसिध कृष्णाला घेण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहने संघातून माघार घेतल्याने प्रसिधला संधी मिळाली.

Web Title: IND vs AUS 2nd ODI Live Updates Shubman Gill Six splendid Pull shot out of the park sixer watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.