Join us

IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला

सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:35 IST

Open in App

IND vs AUS 1st T20, Suryakumar Yadav Brings Up 150 T20I Sixes Breaks MS Dhoni's Record : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ छोट्या फॉरमॅटमध्ये मोठा धमाका करताना पाहाला मिळाले. पण आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी सूर्यकुमार यादव धावांसाठी संघर्ष करताना दिसून आले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. कारण मागील १४ डावांत त्याने केवळ १३.७५ च्या सरासरीसह धावा केल्या. या काळात त्याच्या भात्यातून एकही अर्धशतक आले नाही. पण अखेरच सूर्याचं ग्रहण सुटलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात त्याची बॅट तळपली. अर्धशतकाला गवसणी घालण्याआधीच त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव 

 कॅनबेरा येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात १५ डावानंतर सूर्याच्या भात्यातून दुसऱ्यांदा ३० पेक्षा अधिक धावा आल्याचे पाहायला मिळाले. पावासाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला त्यावेळी सूर्यकुमार यावदनं २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या होत्या.  या डावात २ षटकार मारताच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५० षटकार मारण्याचा मोठा डाव साधला. याआधी फक्त चौघांनीच अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० षटकार मारणारा  सूर्यकुमार यादव हा रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय आहे. क्रिकेट जगतात फक्त ५ फलंदाजांनीच हा डाव साधला आहे. 

भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज 

  • २०५ - रोहित शर्मा
  • १८७ – मोहम्मद वसीम
  • १७३ – मार्टिन गप्टिल
  • १७२ – जोस बटलर
  • १५० – सूर्यकुमार यादव*

हार्दिक पांड्या ग्लेन मॅक्सवेलपेक्षा सूर्या ठरला लयभारी!

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवपेक्षा अधिक सामने खेळले आहेत. पण त्यांच्याआधी सूर्यकुमार यादवनं  १५० षटकार मारण्याच्या मोठा डाव साधला आहे.

महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही मोडला

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीा विक्रमही मोडीत काढला. आंतरराष्ट्री टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवनं धोनीला मागे टाकले आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये एकूण ३१३ धावा केल्या आहेत. सूर्याच्या खात्यात आता ३२९ धावा जमा झाल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs AUS: Suryakumar Yadav shines, breaks Dhoni's record, enters Rohit's club.

Web Summary : Suryakumar Yadav overcomes recent struggles, smashing 150 T20I sixes against Australia. He surpassed MS Dhoni's T20I runs record against Australia and became the second Indian after Rohit Sharma to achieve this milestone, outperforming Maxwell and Pandya.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघ