Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?

सलग दुसऱ्या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 19:23 IST

Open in App

ACC Mens U19 Asia Cup 2025 India U19 vs Pakistan U19 5th Match :   एरोन जॉर्जच्या सलग दुसऱ्या अर्धशतकासह दिपेश देवेंद्रन (Deepesh Devendran) आणि कनिष्क चौहान (Kanishk Chauhan) यांच्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकचा धुव्वा उडवला आहे. १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना ICC अकादमीच्या दुबईच्या मैदानात रंगला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने २४० धावा करत पाकिस्तानसमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १५० धावांत आटोपला.

युवा टीम इंडियाकडून 

पहिल्यांदा फलंदाजीत करताना वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे स्वस्तात आटोपल्यावर एरोन जॉर्ज याने भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने ८८ चेंडूत  ८५ धावांची खेळी केल्यामुळे भारतीय संघ २४० धावांपर्यंत मजल मारू शकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून हुझा हुझाइफा अहसान (Huzaifa Ahsan) यानेने ७० धावांची खेळी केली. पण शेवटी त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.  भारताकडून दीपेश देवेंद्रन याने ७ षटकांत  फक्त १६ धावा खर्च करताना ३  तर कनिष्क चौहानने १० षटकांत ३३ धावा खर्च करत ३ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उटलला.

 या विजयासह भारतीय संघाने सलग दुसरा विजय नोंदवत उपांत्य फेरीतील आपलं तिकीट जवळपास निश्चित केले आहे. ४ गुणांसह भारतीय संघ आपल्या गटात अव्वलस्थानावर आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India U19 Crushes Pakistan in Asia Cup Thriller

Web Summary : India U19 defeated Pakistan in the Asia Cup with strong batting by Aaron George and excellent bowling from Dipesh Devendran and Kanishk Chauhan. India chased down the target of 241, restricting Pakistan to just 150. This victory secures India's place in the semi-finals.
टॅग्स :एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघआयुष म्हात्रेवैभव सूर्यवंशी