ACC Mens U19 Asia Cup 2025 India U19 vs Pakistan U19 5th Match : एरोन जॉर्जच्या सलग दुसऱ्या अर्धशतकासह दिपेश देवेंद्रन (Deepesh Devendran) आणि कनिष्क चौहान (Kanishk Chauhan) यांच्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकचा धुव्वा उडवला आहे. १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना ICC अकादमीच्या दुबईच्या मैदानात रंगला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने २४० धावा करत पाकिस्तानसमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १५० धावांत आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युवा टीम इंडियाकडून एरोन जॉर्ज चमकला!
पहिल्यांदा फलंदाजीत करताना वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे स्वस्तात आटोपल्यावर एरोन जॉर्ज याने भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने ८८ चेंडूत ८५ धावांची खेळी केल्यामुळे भारतीय संघ २४० धावांपर्यंत मजल मारू शकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून हुझा हुझाइफा अहसान (Huzaifa Ahsan) यानेने ७० धावांची खेळी केली. पण शेवटी त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. भारताकडून दीपेश देवेंद्रन याने ७ षटकांत फक्त १६ धावा खर्च करताना ३ तर कनिष्क चौहानने १० षटकांत ३३ धावा खर्च करत ३ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारतीय संघाने सलग दुसरा विजय नोंदवत उपांत्य फेरीतील आपलं तिकीट जवळपास निश्चित केले आहे. ४ गुणांसह भारतीय संघ आपल्या गटात अव्वलस्थानावर आहे.
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
आयुष म्हात्रेचं अर्धशतक हुकलं, पण..
पहिल्या सामन्यातील शतकवीर वैभव सूर्यवंशी अवघ्या ५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार आयुष म्हात्रे याने सुरेख फटकेबाजी केली. तो दुसऱ्या सामन्यात अर्धशतक अगदी सहद झळकावेल, असे वाटत असताना तो बाद झाला. पण त्याआधी त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३८ धावांची उपयुक्त खेळी केली.