IND vs PAK U19 Asia Cup Final : अंडर-१९ आशिया कप २०२५ फायनलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ३४७ धावा केल्या. समीर मिन्हासच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने मोठी धावसंख्या उभारली. पण त्याची विकेट घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक करत पाकिस्तानच्या संघाला ३५० धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली पण...
पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या ३४८ धावांचा पाठलाग करताना भारताचा युवा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं पहिल्याच चेंडूवर षटकार मारत संघासह आपले खाते उघडले. एवढेच नाही तर आता भारतीय फलंदाजांकडून मोठ्या धमाक्याची अपेक्षा आहे.पहिल्या १४ चेंडूत कर्णधार आयुष म्हात्रेसह त्याने संघाच्या धावफलकावर ३२ धावा लावल्या. पण अली रझानं आयुष म्हात्रेच्या रुपात भारताला पहिला धक्कादिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेली एरॉन ९ चेंडूत १६ धावा करुन बाद झाला. अली रझानं वैभव २६ धावांवर वैभव सूर्यवंशीच्या खेळीलाही ब्रेकलावला. त्याने १० चेंडूत १ चौकाराच्या मदतीने २६० च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या.
समीर मिन्हासचं विक्रमी शतक
पाकिस्तानकडून सलामीवीर समीर मिन्हास याने फायनलमध्ये जबाबदारीने खेळत ११३ चेंडूत १७२ धावांची अफलातून खेळी साकारली. त्याच्या डावात संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर मिलाफ पायायला मिळाला. सुरुवातीला सावध खेळ करत त्याने नंतर भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढवत मोठे फटके खेळल्याचे पाहायला मिळाले. अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाच्च धावसंख्या त्याने उभारली.
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
पाकच्या मधल्या फळीतील फलंदाजांनीही केली दमदार खेळी
समीर मिन्हासला अहमद हुसेन (७२ चेंडूत ५६) आणि उमर खान (४५ चेंडूत ३५) यांनी उपयुक्त साथ दिली. शेवटच्या षटकांत नियाज शफीक (नाबाद १२) आणि मोहम्मद सैयाम (नाबाद १३) यांनी महत्त्वाच्या धावा जोडत संघाची धावसंख्या ३४७ पर्यंत पोहोचवली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला अवांतर धावांच्या रुपात एकूण १३ धावा दिल्या.
भारतीय गोलंदाजांचं कमबॅक
पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये डी. देवेंद्रन हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ८३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्ष पटेल याने १० षटकांत ६२ धावा देत २ विकेट्स घेत प्रभावी मारा केला. कुशल चौहान यानेही १० षटकांत १ विकेट मिळवली. के. पटेल याने १० षटकांत ४४ धावा देत २ विकेट्स घेतल्या.