India A vs South Africa A, 2nd Unofficial Test Dhruv Jurel Century: भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील दुसरा अनौपचारिक कसोटी सामना बंगळुरुस्थित बीसीसीआयच्या एक्सलन्स ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतीय फलंदाजांनी निराश केले. टीम इंडियाा स्टार लोकेश राहुल, साई सुदर्शनसह देवदत्त पडिक्कल पाठोपाठ भारतीय 'अ' संघाचं नेतृत्व करणारा रिषभ पंतही स्वस्तात माघारी फिरला. संघ अडचणीत सापडला असताना ध्रुव जेरेल याने नाबाद शतकी खेळीसह दिवस गाजवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केएल राहुल, पंतसह साईचा फ्लॉप शो! अवघ्या ८६ धावांवर अर्धा संघ परतला होता तंबूत
पहिल्यांदा फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या साथीनं अभिमन्यू ईश्वरन याने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. ३ चेंडूचा सामना करून अभिमन्यू ईश्वरन शून्यावर माघारी फिरला. लोकेश राहुलनं ४० चेंडूत १९ धावा केल्यावर आपली विकेट गमावली. टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळालेल्या साई सुदर्शनही १७ धावांवरच अडखळला. देवदत्त पडिक्कल ५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार रिषभ पंतच्या रुपात ८६ धावांवर भारतीय संघाला पाचवा धक्का बसला. त्याने फक्त २४ धावा केल्या. संघ अडचणीत असताना ध्रुव जुरेल याने शेवटपर्यंत मैदानात थांबला.
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
भारतीय संघ २५५ धावांवर ऑलआउट, ध्रुव जुरेल शतकी खेळीसह नाबाद
आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यावर ध्रुव जुरेल यांने संघाला सन्मानजकन धावसंख्येपर्यंत पोहवताना नाबाद शतक झळकावले. त्याने १७५ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकाच्या मदतीने नाबाद १३२ धावांची खेळी केली. कुलदीपच्या साथीनं आठव्या विकेटसाठी त्याने ७९ धावा जोडल्या. नवव्या विकेटसाठी सिराजनंही त्याला साथ दिली. त्याच्या साथीनं त्याने नवव्या विकेटसाठी ३४ धावांची भर घातली. त्याच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दुसऱ्या अखेर पहिल्या डावात सर्वबाद २५५ धावांपर्यंत मजल मारली.
घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकली दावेदारी
भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पंतच्या कमबॅकमुळे विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेलला संघात स्थान मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला कमबॅकमध्ये पंत फ्लॉप ठरला असताना ध्रुव जुरेल याने भारत 'अ' संघाकडून शतकी खेळी करत आगामी कसोटी मालिकेसाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करताना पंतकडे पुन्हा उप कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे तो आगामी मालिकेत खेळणार हे निश्चित आहे. पण या खेळीच्या जोरावर बॅटरच्या रुपात ध्रुव जुरेल याला संघात संधी मिळू शकते.