Ayush Mhatre Brings Up His Maiden Fifty On Debut For The India A Aginst Sout Africa A :  रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय 'अ' संघात संधी मिळालेल्या १८ वर्षीय आयुष म्हात्रेनं दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्ध अगदी धमाकेदार पदार्पण केले आहे. १० प्रथम श्रेणी सामन्यात आयुष्य म्हात्रेची आकडेवारी फारशी चांगली नव्हती. त्याने फक्त ३०.२७ च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. पण आकडेवारी बाजूला ठेवून निवडकर्त्यांनी CSK च्या ताफ्यातून धोनीच्या नेतृत्वाखालील खेळताना दिसलेल्या या पठ्ठ्याला क्षमतेच्या जोरावर  संधी दिली आणि त्याने या संधीचं सोनं करून दाखवणारी खेळी केली. भारतीय 'अ' संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळीसह आपल्यातील धमक दाखवली.
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
साई सुदर्शनच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ९० धावांची दमदार भागीदारी
भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील दोन सामन्यांच्या अनौपचारिक कसोटी सामन्यातील पहिला सामना बंगळुरुस्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघाला ३०९ धावांत ऑलआउट केल्यावर भारतीय संघाकडून आयुष म्हात्रेनं साई सुदर्शनच्या साथीनं भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात केली.  वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीत धमक दाखवणारा साई सुदर्शन धावांसाठी संघर्ष करत असताना आयुष्य म्हात्रेनं कडक फटकेबाजीसह सर्वांचे लक्षवेधून घेणारी खेळी केली . पहिल्या विकेटसाठी त्याने साई सुदर्शनच्या साथीनं ९० धावांची भागीदारी रचली.  
रिषभ पंतचा कोहलीच्या १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीवर डोळा? जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट
टीम इंडियाकडून पदार्पणात शतकी खेळीची संधी हुकली, पण... 
IPL मध्ये ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळताना आयुष्य म्हात्रे चर्चेत आला. आता भारतीय 'अ' संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात त्याने ७६ चेंडूत ६५ धावांची कडक खेळी केली. तो शतकी डाव साधणार असे चित्र निर्माण झाले असताना दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील फिरकीपटू प्रेनेलन सुब्रायन याने त्याच्या युवा सलामीवीराच्या इनिंगला ब्रेक लावला.  शतकी खेळीची संधी हुकले, पण  पदार्पणातील अर्धशतकासह त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध करणारी आहे.
प्रथम श्रेणीत दोन शतके, IPL मध्येही दाखवलीये धमक
दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्ध आयुष्य म्हात्रे प्रथम श्रेणीतील ११ वा सामना खेळत आहे. याआधी त्याने  प्रथम श्रेणीत २ शतके झळकावली आहेत. IPL च्या गत हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आयुष्य म्हात्रेनं ३४ च्या सरासहीसह १९० च्या स्ट्राईक रेटनं २४० धावा कुटल्या होत्या. वाइल्ड कार्ड एन्ट्रीसह CSK च्या ताफ्यात एन्ट्री मिळाल्यावर त्याने या संघातील आपली जागा जवळपास पक्की केली आहे.