ACC Mens Asia Cup Rising Stars 2025 : रायझिंग स्टार टी २० आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात भारत 'अ' संघ सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान 'अ' संघाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या ओमान विरुद्धच्या लढतीला क्वार्टर फायनलचं स्वरुप आले आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताचा युवा स्फोटक बॅटर वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. या सामन्यात जो संघ जिंकेल तो सेमी फायनलमध्ये धडक मारेल. इथं एक नजर टाकुयात हा सामना कुठं अन् कसा पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुठं अन् कधी रंगणार IND A vs Oman यांच्यातील सामना?
भारत 'अ' विरुद्ध ओमान यांच्यातील सामना १८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. कतारमधील दोहा येथील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार, रात्री ८ वाजता हा सामना रंगणार असून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकून २-२ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. या सामन्यातील विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. या सामन्यात भारताचे पारडे जड असून जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सेमीचं तिकीट बूक करेल, अशी अपेक्षा आहे.
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
क्रिकेट चाहत्यांना कुठं घेता येईल या सामन्याचा आनंद?
रायझिंग स्टार टी २० आशिया कप स्पर्धेतील भारत 'अ' विरुद्ध ओमान यांच्यातील सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय सोनी LIV अॅपवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रेमिंग उपलब्ध असेल.
वैभव सूर्यवंशीची हवा, आशिया कप स्पर्धेत २७० च्या स्ट्राइक रेटनं केल्यात धावा
भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यंवशी याने या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात २७० च्या स्ट्राइक रेटनं १८९ धावा केल्या आहेत. यात युएई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १४४ धावांची विक्रमी खेळी केली साकारली होती. पाकिस्तान 'अ' विरुद्धच्या सामन्यात त्याने ४५ धावा केल्या. धावांची खेळी केली. ओमानविरुद्धही तो धमाका करेल, अशी अपेक्षा आहे.