Join us  

"मी सांगितलंय म्हणजे तू कायमस्वरूपी कॅप्टनच", हरमनप्रीतने मराठमोळ्या आजीबाईंच जिकलं मन!

WPL 2023: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 4:02 PM

Open in App

harmanpreet kaur, video । मुंबई : महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL 2023) सलग पाचवेळा विजय मिळवून मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळले आहेत. यूपी वॉरियर्सविरूद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता मुंबईच्या संघाने शानदार कामगिरी केली. खरं तर मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत करण्यात यूपी वॉरियर्सच्या संघाला यश आले. या सामन्यानंतर मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने मराठमोळ्या आजीबाईंची खास भेट घेतली, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यात यूपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 128 धावांचे आव्हान ठेवले होते. कमी धावांचा बचाव करताना मुंबईने शानदार खेळ दाखवला. यूपी वॉरियर्सच्या संघाने रोमांचक सामन्यात 19.3 षटकात 5 विकेट गमावून लक्ष्य गाठले. या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच पराभव ठरला, तर यूपी वॉरियर्सने विजयानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

यूपी वॉरियर्सविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आजीबाईंची खास भेट घेतली. मी फक्त तुला खेळताना पाहण्यासाठी आली असल्याचे आजीबाईंनी हरमनला सांगितले. याशिवाय मी म्हणते म्हणजे तू कायमस्वरूपी कर्णधार असशील, अशा शब्दांत या आजीबाईंनी हरमनप्रीत कौरवर कौतुकाचा वर्षाव केला. पुढचा सामना देखील पाहायला या, असे हरमनने म्हणताच आजीबाईंनी तब्येतीचा हवाला देत स्पष्ट नकार दिला. या सर्व संभाषणानंतर हरमनप्रीत कौरने आजीबाई आणि त्यांच्या नातेवाईंकासोबत फोटो देखील काढला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सहरनमप्रीत कौरमुंबई
Open in App