"मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया

KKR vs PBKS : रिंकू सिंगने विजयी चौकार मारून पंजाब किंग्जचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 08:49 AM2023-05-09T08:49:12+5:302023-05-09T08:49:37+5:30

whatsapp join usJoin us
   In IPL 2023, KKR VS PBKS, Rinku Singh hit Arshdeep Singh for a boundary off the last ball to give Kolkata Knight Riders victory  |  "मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया

 "मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rinku singh ipl 2023 । कोलकाता : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. काल झालेल्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जला पराभवाची धूळ चारली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंगने विजयी चौकार मारून सामना आपल्या नावावर केला. या विजयामुळे केकेआरचा संघ अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. खरं तर रिंकू सिंग पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघासाठी काळ ठरला. रिंकूने १० चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार मारला.

रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी २७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी नोंदवली. कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात ५ गडी गमावून पूर्ण केले. केकेआरला शेवटच्या षटकात सहा धावांची आवश्यकता होती. ६ धावांचा बचाव करण्यासाठी पंजाबचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप सिंगकडे चेंडू सोपवला. अर्शदीपने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्या बाजूने ठेवला पण रिंकू सिंगने कमाल करत शेवटच्या चेंडूवर चौकार मारला अन् आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. 

रिंकू-रिंकू...! मैदानात एकच जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला 'प्रेमाचा वर्षाव'

तत्पुर्वी, शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १७९ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर रिंकू सिंगने म्हटले, "मी चेंडूची गती पाहून खेळत होतो. मला स्वत:वर विश्वास होता की मी सामना संपवू शकतो. मला आता याची सवय झाली आहे, कधी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर कधी सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. मला आनंद साजरा करण्याची कोणती खास पद्धत माहित नाही." 

गुणतालिकेत केकेआरची भरारी 
कालच्या विजयामुळे केकेआरचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहिला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आता केकेआरचा संघ १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 


 
 

Web Title:    In IPL 2023, KKR VS PBKS, Rinku Singh hit Arshdeep Singh for a boundary off the last ball to give Kolkata Knight Riders victory 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.