Join us

Rahul Dravid : मी आजही एवढा प्रचलित नाही!, Dravid नाही David, राहुल द्रविडने सांगितला भन्नाट किस्सा!

भारताचा माजी कर्णधार व सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दिच्या सुरुवातीच्या काळातील एक भन्नाट किस्सा सांगितला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:05 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार व सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दिच्या सुरुवातीच्या काळातील एक भन्नाट किस्सा सांगितला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्रा याने घेतलेल्या एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला. राहुल द्रविडनेभारतीय क्रिकेट संघात मिळेल त्या जबाबदारीला न्याय दिला. कधी सलामीवीर, कधी कर्णधार, कधी गोलंदाज, तर कधी यष्टिरक्षक या सर्व जबाबदाऱ्या राहुलने चोख पार पाडल्या. पण, अजूनही मी एवढा प्रसिद्ध नाही, असे मत द्रविडने व्यक्त केले. 

भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या टीम इंडियासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. 'In the Zone' पोडकास्टवर त्याने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी द्रविडने त्याच्या लहानपणीचा किस्सा सांगितला. शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेतील पहिले शतक झळकावल्यानंतर वृत्तपत्रात त्याचं नाव कसं चुकीचं छापून आलं याबाबतचा तो किस्सा आहे. तो म्हणाला, त्या वृत्तपत्राच्या संपादकांना Dravid असे नाव असेल यावर विश्वास नव्हता.. त्यांना ती स्पेलिंग मिस्टेक वाटत होती आणि त्यांनी हे नाव David असं असेल बरोबर?, असा सवालही केला होता. कारण, डेव्हिड हे नाव खुपच प्रचलित आहे. हा माझ्यासाठी चांगला धडा होता. आजही मी तितका प्रचलित नाही. लोकांना माझं नाही माहीत नाही. माझं नाव असंच आहे यावरही त्यांचा विश्वास बसत नाही. ''2008मध्ये मी खराब फॉर्मातून जात होतो. मला फॉर्मात परतायचे होते आणि त्यासाठी मी प्रयत्नशील होतो. माझ्याकडे आणखी काही वर्ष क्रिकेट बाकी आहे, हे मला माहीत होते. त्याचवेळी मी अभिनव बिंद्राच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाची कामगिरी पाहिली,''असेही द्रविडने सांगितले.  

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App