मेलबोर्न : भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान लक्ष विचलित झाले होते, या वक्तव्यावर कायम असल्याचे स्पष्ट करीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नसल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाच्या लक्ष विचलित करण्याच्या त्याच्या वक्तव्यावर टीका झाली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक ॲडम गिलख्रिस्टसोबत पॉडकास्टमध्ये स्वत: असे वक्तव्य केले होते. पेनने ‘गिल अँड गोस पॉडकास्ट’मध्ये शुक्रवारी, भारताविरुद्ध मालिकेत पराभूत होण्यामागील कारण सांगताना म्हटले होते की, ‘ भारताने आमचे लक्ष विचलित केले. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो. भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळणार नाही, असे म्हणताच ते कुठे खेळण्यास उत्सुक आहेत, याचा आम्हाला वेध घेता आला नाही. त्या दौऱ्यात भारतीय संघ गाबा मैदानावर खेळणार नाही, अशी चर्चा होती. भारत या मैदानावर खेळला आणि अखेरच्या दिवशी ऐतिहासिक विजय नोंदविण्यात यशस्वीदेखील झाला.’ दरम्यान,मी हे सुद्धा म्हणालो होतो की,‘भारतीय संघाने आमच्यावर वर्चस्व गाजवले. ते विजयाचे हकदार होते.’ पण हे वाक्य कापण्यात आले. भारतीय चाहते सोशल मीडियावर माझ्यावर टीका करीत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नाही - टीम पेन
पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नाही - टीम पेन
भारताने आमचे लक्ष विचलित केले. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 10:36 IST