Join us  

मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून बाद झाले अन् आता फलंदाज प्रशिक्षकासाठी मैदानात उतरले

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय संघाने शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 9:43 AM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय संघाने शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या शर्यतीत शास्त्रींना ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माईक हेसन यांच्याकडून कडवी टक्कर मिळाली. शिवाय भारताचे रॉबीन सिंग आणि लालचंद राजपूत यांनीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. पण, अखेरीस समितीनं शास्त्री यांची निवड केली. मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या राजपूत यांनी आता त्यांचा मोर्चा फलंदाजी प्रशिक्षकाकडे वळवला आहे. 

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राजपूत यांच्यासह भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानेही अर्ज केला आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड केली जाणार आहे. 57 वर्षीय राजपूत यांना फलंदाज प्रशिक्षकपदासाठी माजी कसोटी सलामीवीर विक्रम राठोर याची कडवी टक्कर आहे. संजय बांगर यानेही पुन्हा या पदासाठी अर्ज केला आहे, परंतु त्याची फेरनियुक्ती होणे अवघडच आहे. गोलंदाज प्रशिक्षकासाठी भरत अरूण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षणासाठी आर श्रीधर यांनाच संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. गुरुवारपर्यंत सर्व मुलाखती पूर्ण होतील आणि त्यानंतर सर्व पदावरील विजयी उमेदवाराची नावे जाहीर केली जातील.

फलंदाज प्रशिक्षकासाठी प्रविण आम्रे, अमोल मुझुमदार आणि सिंतांशू कोटक हेही शर्यतीत आहेत.  गोलंदाज प्रशिक्षकासाठी वेंकटेश प्रसाद, पारस म्हाब्रे आणि अमित भंडारी यांनी अर्ज केले आहेत. 16 ऑगस्टला झालेल्या प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीनंतर 57 वर्षीय शास्त्रींची फेरनियुक्ती करण्यात आली. नोव्हेंबर 2021पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. या कालावधीत शास्त्री यांच्यासमोर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि अनेक होम-अवे मालिका आहेत.

प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'!

 

पारदर्शक निवड प्रक्रिया दीर्घकाळासाठी महत्त्वाची

Breaking: विराट कोहलीला 'देव' पावले; पुन्हा रवी शास्त्रीच टीम इंडियाचे 'महागुरू'

रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल!

Video : प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरवी शास्त्रीबीसीसीआय