Video : प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावाची फेरनिवड झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:01 PM2019-08-17T16:01:54+5:302019-08-17T16:02:38+5:30

whatsapp join usJoin us
Watch: An honour and privilege to be retained as India head coach, says Ravi Shastri | Video : प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Video : प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावाची फेरनिवड झाली. कपिल देव हे प्रमुख असलेल्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं शुक्रवारी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली. 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. या मुलाखतीनंतर शास्त्रींनी शनिवारी पहिली प्रतिक्रिया दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शनिवारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 

शास्त्री म्हणाले की,'' कपिल, शांता आणि अंशुमन यांच्या क्रिकेट सल्लागार समितीचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुढील 26 महिन्यांसाठी मुख्य प्रशिक्षकपदावर मला कायम ठेवले. या संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे हे मी माझे भाग्य समजतो. या संघावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. फार कमी संघांना तसे करणं जमतं. गेली तीनेक वर्ष हा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.'' 


शास्त्री यांच्यासह प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत न्यूझीलंडचे माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी आणि भारताचे रॉबीन सिंग व लालचंद राजपुत हेही होते. वेस्ट इंडिजच्या फिल सिमन्सने मुलाखतीपूर्वीच वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली.  

मुलाखतीत शास्त्रींना वर्ल्ड कप स्पर्धेतील मधल्या फळीच्या फलंदाजांच्या अपयशाबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना शास्त्रींनी भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेबाबत एक विनंती समितीकडे केली. ''शास्त्रींना संघ निवड प्रक्रियेपासून दूर ठेवले होते. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मधल्या फळीत जो फलंदाज संघ व्यवस्थापनाला हवा होता, त्याची निवड केली गेली नाही. त्याशिवाय संघ व्यवस्थापनाला संघ निवडीच्या बैठकीत मत मांडण्याचा अधिकारही नव्हता. त्यामुळे संघ निवडताना कर्णधार आणि प्रशिक्षक या दोघांची मतं जाणून घेतले जावे, अशी मागणी शास्त्रींनी केली आहे,'' असे सल्लागार समितीतील सदस्याने सांगितले.

भारत वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध का हरला, या प्रश्नावर शास्त्रींनी दिले भन्नाट उत्तर
भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, असा प्रश्न सल्लागार समितीने शास्त्री यांना विचारला. या प्रश्नावर शास्त्रींनी भन्नाट उत्तर दिले. शास्त्री म्हणाले की, " क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. पण तो दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे सांगता येत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचा दिवस आमचा नव्हता. पण एखादा दिवस तुमच्या बाजूने नसेल तर तुमचा संघ वाईट ठरत नाही."

पाहा संपूर्ण व्हिडीओ
http://www.bcci.tv/videos/id/7806/an-honour-privilege-to-be-retained-as-coach-ravi-shastri
 

Web Title: Watch: An honour and privilege to be retained as India head coach, says Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.