कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३० धावांनी आघाडी घेतली होती. पण शेवटी टीम इंडियावर तेवढ्याच धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवासह भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० पिछाडीवर पडला आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे.
टीम इंडियाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेनं मारलं कोलकाताचं मैदान
कोलकाता कसोटीतील नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १५९ धावांत आटोपले होते. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात १८९ धावा करून ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १५३ धावा करत टीम इंडियासमोर १२४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडिया शंभरीच्या आत म्हणजे ९३ धावांवर आटोपली. इथं एक नजर टाकुयात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निकालानंतर WTC गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर? यासंदर्भातील सविस्तर माहिती
टीम इंडिया फटका, दक्षिण आफ्रिकेची उंच उडीकोलकाता येथील कसोटी सामन्या आधी भारतीय संघ ६१.९० विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहोत. या पराभवानंतर टीम इंडिया ५४.१७ विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या सामन्यातील विजयासह ३ सामन्यातील २ विजय आणि १ पराभवासह ६६.६७ विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
ICC WTC Points Table मध्ये कोणता संघ कितव्या स्थानी?
| क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | कपात | गुण | विजय टक्केवारी |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ऑस्ट्रेलिया (AUS) | ३ | ३ | ० | ० | ० | ३६ | १००.०० टक्के |
| २ | दक्षिण आफ्रिका (SA) | ३ | २ | १ | ० | ० | २४ | ६६.६७ टक्के |
| ३ | श्रीलंका (SL) | २ | १ | ० | १ | 0 | १६ | ६६.६७ टक्के |
| ४ | भारत (IND) | ८ | ४ | ३ | १ | ० | ५२ | ५४.१७ टक्के |
| ५ | पाकिस्तान (PAK) | २ | १ | १ | ० | ० | १२ | ५०.०० टक्के |
| ६ | इंग्लंड (ENG) | ५ | २ | २ | १ | २ | २६ | ४३.३३ टक्के |
| ७ | बांगलादेश (BAN) | २ | 0 | १ | १ | ० | ४ | १६.६७ टक्के |
| ८ | वेस्ट इंडिज (WI) | ५ | ० | ५ | ० | ० | ० | ०.०० टक्के |