ICC WTC 2025-27 Points Table : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमव रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहण्यांचा खेळ खल्लास केला. पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि १४० धावांनी विजय नोंदवत भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील कसोटी मालिका ही ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. इथं एक नजर टाकुयात या निकालानंतर ICC WTC 2025-27 Points Table मध्ये कोणता संघ कुठल्या स्थानावर आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलिया १०० टक्के विनिंग पर्सेंटेजसह अव्वल, त्यांच्यापाठोपाठ लागतो लंकेचा नंबर
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ अव्वलस्थानी आहे. आतापर्यंत त्यांनी ३ कसोोटी सामन्यातील ३ विजयासह ३६ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. १०० टक्के विनिंग पर्सेंटेजसह ते अव्वलस्थानी आहेत. इथं श्रीलंकेचा संघ अजूनही टीम इंडियावर भारी ठरतोय. २ कसोटी सामन्यातील १ विजय आणि १ अनिर्णित सामन्यासह त्यांच्या खात्यात ६६.६७ विनिंग पर्सेंटेजसह १६ गुण जमा आहेत.
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
दुसऱ्या मालिकेतील पहिल्या विजयासह टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी स्पर्धेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या मोहिमेला सुरुवात केली. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-२ बरोबरीचा डाव साधला होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीनंतर ६ सामन्यातील ३ विजय २ पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह भारतीय संघ ५५.५६ विनिंग पर्सेंटेजसह ४० गुण खात्यावर जमा करून तिसऱ्या स्थानावर आहे.
चौथा सामना खेळूनही वेस्ट इंडिजची पाटी अजून कोरीच
इंग्लंडचा संघ ५ सामन्यानंतर २ विजय, २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ४३.३३ विनिंग पर्सेंटेजसह २६ गुण मिळवत चौथ्या, बांगलादेशचा संघ २ सामन्यातील १ पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह ४ गुण मिळवत १६.६७ वनिंग पर्सेंटेजसह पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने गमावले असून त्यांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघाने अजून आपल्या मोहिमेची सुरुवात केलेली नाही. त्यामुळे ते अजून या शर्यतीत आलेले नाहीत.
ICC WTC 2025-27 Points Table मध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी?
| स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | नेट रनरेट | गुण | टक्केवारी (%) |
|---|
| १ | ऑस्ट्रेलिया | ३ | ३ | ० | ० | ० | ३६ | १००.००० |
| २ | श्रीलंका | २ | १ | ० | १ | ० | १६ | ६६.६७० |
| ३ | भारत | ६ | ३ | २ | १ | ० | ४० | ५५.५६० |
| ४ | इंग्लंड | ५ | २ | २ | १ | ० | २६ | ४३.३३० |
| ५ | बांगलादेश | २ | ० | १ | १ | ० | ४ | १६.६७० |
| ६ | वेस्ट इंडिज | ४ | ० | ४ | ० | ० | ० | ०.००० |