Join us

ICC World Twenty20 : सेमीफायनल मॅच, टीम इंडियाची जर्सी अन् पाकिस्तानला सपोर्ट? फोटो व्हायरल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेला एक व्यक्ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन जोशमध्ये उभा असल्याचं दिसून येतंय. पत्रकार अब्दुल कादीर यांनी हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 13:35 IST

Open in App
ठळक मुद्देभारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काहींनी पाकिस्तानचा विजय साजरा केला होत, त्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

दुबई - भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय चाहते नाराज झाले आहेत. मात्र, टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांचं काय होणार, कोण ठरण जगजेत्ता याची उत्सुकता अद्यापही कायम आहे. त्यात, गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यासाठी पाकिस्तानला चिअरप करण्यासाठी काही भारतीयांनी मैदान गाठले होते. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेला एक व्यक्ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन जोशमध्ये उभा असल्याचं दिसून येतंय. पत्रकार अब्दुल कादीर यांनी हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानला भारतीय नागरिकांनी चिअरप केल्याचं कादीर यांनी सांगितलंय. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काहींनी पाकिस्तानचा विजय साजरा केला होत, त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या फोटोवरुनही अनेक चर्चा घडताना दिसत आहेत. 

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 1 धावाने विजय मिळवला. त्यानंतर, पाकिस्तान संघाला चांगलच ट्रोल करण्यात येत आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात 5 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना 176 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानच्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 19 व्या षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयश्री मिळवली. त्यामुळे, आता 14 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघपाकिस्तान
Open in App