Join us  

आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

By मोरेश्वर येरम | Published: November 20, 2020 10:26 AM

Open in App
ठळक मुद्देआयसीसी कसोटी चॅम्पियनशीपच्या क्रमवारीत भारताने अव्वल स्थान गमावलेआयसीसीच्या नव्या नियमामुळे ऑस्ट्रेलियाने भारताला टाकले मागेगुणांच्या नव्हे, तर टक्केवारीच्या आधारावर ठरणार अंतिम फेरीतील संघ

मुंबईआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी विजेतेपदासाठीच्या एका नियमात बदल केला आहे. 'कोविड-१९ च्या संकटामुळे जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधावर घेतला जाईल', असं आयसीसीनं जाहीर केलं आहे. 

आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. याआधी गुणांच्या आधारावर भारतीय संघ अव्वल स्थानी होता. मात्र आयसीसीच्या नव्या नियमाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. 

ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या एकूण मालिका आणि मिळवलेले गुण यांची टक्केवारी ८२.२ इतकी होते. तर भारतीय संघाच्या गुणांची टक्केवारी ७५ इतकी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक गुण असूनही भारतीय संघाची आता गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. 

भारताकडे आतापर्यंत चार मालिकांमध्ये ३६० गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३ मालिकांमधील २९६ गुण आहेत. भारताला अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीआयसीसीअनिल कुंबळेआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ