ICC World Test Championship Points Table 2025-27 : जमैका येथील किंग्स्टन सबिना पार्कच्या मैदानात वेस्ट इंडिज संघाचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन संघाने १०० टक्के विजयी टक्केवारीसह WTC २०२५-२७ च्या चक्रात आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला लॉर्ड्सवरील पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत श्रीलंकन संघ टीम इंडियावर भारी ठरताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियन संघ टॉपला
ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून नव्या आणि चौथ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामाला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावरुन नव्या चक्राची सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० अशी जिंकली आहे. सर्वाधिक ३६ गुणांसह १०० टक्के विनिंग पर्सेंटेजसह ऑस्ट्रेलिया संघ टॉपला आहे.
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
लॉर्ड्स मैदान गाजवत इंग्लंडचा संघ पोहचला दुसऱ्या स्थानी
भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आला. अखेरच्या दिवसापर्यंत रंगतदार झालेला हा सामना जिंकत इंग्लंडच्या संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. २४ गुणांसह त्यांची विजयाची टक्केवारी आता ६६.६७ इतकी आहे.
श्रीलंकेचा संघ ठरला टीम इंडियापेक्षा भारी
श्रीलंकेचा संघ बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सामन्यातील १ विजय आणि एक सामना अनिर्णित राखून १६ गुणांसह ६६.६७ टक्के विनिंग पर्सेंटेजसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या ३ कसोटी सामन्यातील एका सामन्यात विजय मिळवलाय. १२ गुण आणि ३३.३३ विजयी टक्केवारीसह टीम इंडिया WTC क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजसह या संघाची पाटी कोरी
बांगलादेश संघ एक पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ४ गुणांसह १६.६७ अशा विजयी टक्केवारीसह पाचव्या तर वेस्ट इंडिजच्या संघ सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अद्याप नव्या चक्रात एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
WTC Points Table मध्ये कोणता संघ कितव्या स्थानी?
स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | धावगती | गुण | विजयी टक्केवारी |
१ | ऑस्ट्रेलिया | ३ | ३ | ० | ० | - | ३६ | १०० टक्के |
२ | इंग्लंड | ३ | २ | १ | ० | - | २४ | ६६.६७ टक्के |
३ | श्रीलंका | २ | १ | ० | १ | - | १६ | ६६.६७ टक्के |
४ | भारत | ३ | १ | १ | ० | - | १२ | ३३.३३ टक्के |
५ | बांगलादेश | २ | ० | १ | ० | - | ४ | १६.६७ टक्के |
६ | वेस्ट इंडिज | ३ | ० | ३ | ० | - | - | - |
७ | दक्षिण आफ्रिका | - | - | - | - | - | - | - |
८ | न्यूझीलंड | - | - | - | - | - | - | - |
९ | पाकिस्तान | - | - | - | - | - | - | - |