South Africa Announces Squad For WTC Final After Australia : आयसीसी वर्ल्ड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या तिसऱ्या हंगामातील फायनलसाठी ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघही तयार झालाय. ११ जून पासून इंग्लंडमधील लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात हे दोन संघ चांदीच्या गदा उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन्ही हंगामात भारतीय संघ फायनल खेळला. पण पहिल्या हंगामात न्यूझीलंड आणि दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलिया भारताच्या वाटेत अडथळा ठरला. आता ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्यांदा बाजी मारणार की, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकणार ते पाहण्याजोगे असेल. WTC च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. इथं जाणून घेऊयात मेगा फायनलसाठी कसे आहेत दोन्ही संघ यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB च्या ताफ्यातून दिसणाऱ्या लुंगी एनिगडीला मिळाली संधी
११ ते १५ जून या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. महत्त्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने लुंगी एनिगडी यालाही आपल्या ताफ्यात सामील केले आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून काही काळ दूर राहिल्यावर हा गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून खेळताना दिसतोय.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात कमालीचा समतोल
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची फलंदाजीतील मदार ही टोनी डी जॉर्जी, रायन रिकल्टन आणि एडेन मार्करम यासारख्या तगड्या गड्यांवर असेल. मध्यफळीत टेम्बा बावुमावर मोठी जबाबदारी असेल. याशिवायडेविड बेडिंगहम आणि ट्रिस्टन स्टब्ससह संघाने मध्यफळीतील फलंदाजी भक्कम केलीये. रिकल्टनशिवाय विकेटकीपरच्या रुपात संघाने काइल वेरेन याचा संघात समावेश केला आहे. कॉर्बिन बॉश, मार्को यान्सेन आणि वियान मुल्डर या अष्टपैलू खेळाडूंसह गोलंदाजीत कगिसो रबाडा, लुंगी एननिगडी आणि डेन पेटरसन यांचा संघात समावेश आहे.
WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जी, एडेन मार्करम, वियान मुल्डर, मार्को यान्सेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनिगडी, कोर्बिन बॉश, काइल वेरेन, डेविड बेडिंघम, ट्रिस्टन स्टब्स, रायान रिकल्टन, सेनुरन मुथुसामी, डेन पेटरसन.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुनहेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.