ICC World Test Championship Final 2025 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना कगिसो रबाडा याने गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचे कंबरडे मोडले. ३ निर्धाव षटके टाकल्यावर चौथ्या षटकात रबाडाने उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. कगिसो रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर सोशल मीडियावर दोन कारणांमुळे जसप्रीत बुमराह देखील चर्चेत आला आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रबाडानं विकेट घेतली अन् बुमराह चर्चेत, कारण
कगिसो रबाडा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल लढतीत पहिली विकेट घेताच जसप्रीत बुमराह चर्चेत आला. सोशल मीडियावर जसप्रीत बुमराह आणि कगिसो रबाडा यांच्यातील WTC फायनलमधील कामगिरीच्या मुद्यावरुन चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ दोन वेळा फायनल खेळला असला तरी जसप्रीत बुमराह फक्त एकच फायनल खेळला आहे. पहिल्या हंगामातील न्यूझीलंड विरुद्धच्या WTC फायनल वेळी तो भारतीय संघाचा भाग होता. पण ३५ पेक्षा अधिक षटके टाकल्यावरही विकेट मिळाली नव्हती. दुसरीकडे रबाडाने चौथ्या षटकातच आपली छाप सोडली अन् तो फायनलमध्ये बुमरापेक्षा पुढे निघून गेला. हे बुमराह चर्चेत येण्यामागचं पहिलं कारण आहे.
WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की
ऑस्ट्रेलियासमोर बुमराहपेक्षा भारी ठरला रबाडा
WTC फायनलच्या पहिल्या दिवसातील पहिल्या डावात रबाडाने २ विकेट्स घेताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत ५० विकेट्सचा टप्पा गाठला. ही कामगिरी नोंदवताना त्याने जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड मोडीत काढला. आतापर्यंत कसोटीत ६४ गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० कसोटी सामने खेळले आहेत. यातील फक्त रबाडा आणि बुमराह हे दोनच गोलंदाज असे आहेत ज्यांची ऑस्ट्रेलिया विरुद्धचा स्ट्राइक रेट ४० पेक्षा कमी आहे. जसप्रीत बुमराहनं १२ कसोटी सामन्यात ३९.९ च्या स्ट्राइक रेटसह ६४ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे रबाडाने ११ सामन्यात ३८.८ च्या स्ट्राइक रेटसह ५१ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत बुमराहपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा रबाडा भारतीय ठरला आहे.