Join us

भारतीय संघाने इंग्लंडला नमवून पाकिस्तानची कोंडी केली; WTC मध्ये मोठी झेप घेतली

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 14:45 IST

Open in App

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २९२ धावांवर माघारी परतला. आर अश्विन व जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहने ( ४५/६ व ४६/३) एकूण ९ विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना जिंकून पाकिस्तानला धक्का दिला आहे. 

यशस्वी जैस्वालच्या २०९ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गडगडला. जसप्रीतने ६ विकेट्स घेतल्या, तर कुलदीपने ३ बळी टिपले. यानंतर दुसऱ्या डावात शुबमन गिलने शतकी खेळी करून भारताला २५५ धावांपर्यंत पोहोचवले. इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत व अश्विन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडकडून झॅक क्रॉली ( ७३) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.  

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत झेपइंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी गमावल्यानंतर भारताची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरण झाली होती. पण, आजचा सामना जिंकून भारत पुन्हा ५२.७७ टक्के सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलिया ५५ टक्क्यांसह अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व बांगलादेश यांचे प्रत्येकी ५० टक्के आहेत. पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर ( ३६.६६ टक्के ) घसरला आहे. इंग्लंड २५ टक्क्यांसह आठव्या आणि वेस्ट इंडिज ३३.३३ टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत