Join us

ICC World Cup 2019 : युवराजने निवडले अंतिम चार; भारताला 'हा' संघ करणार बेजार!

ICC World Cup 2019: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेल्या युवराज सिंगने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे अंतिम चार संघ निवडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 15:15 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेल्या युवराज सिंगने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे अंतिम चार संघ निवडले आहेत. त्याच्या या संघांत भारत आणि इंग्लंड यांचे स्थान पक्कं आहे, परंतु तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल, असे मत युवीनं व्यक्त केलं.  

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराजनं निवृत्ती घेत असल्याचे नुकतेच जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यानं ही घोषणा केली.  त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता. 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. 

तो म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे संघ अंतिम चारमध्ये स्थान पटकावतील, तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड/वेस्ट इंडिज यांच्यात चढाओढ पाहायला मिळेल. पाकिस्ताननं यजमान इंग्लंडला नमवलं आहे, त्यामुळे त्यांचा काही नेम नाही. ही स्पर्धा अधिक रंजक होणार आहे. भारताला यजमान इंग्लंडकडून कडवी टक्कर मिळू शकते. '' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019युवराज सिंगभारतइंग्लंडआॅस्ट्रेलियान्यूझीलंडपाकिस्तान