ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एक खास गोष्ट घडली. विश्वचषकात तर तब्बल 23 वर्षांनी ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले आहे. ही गोष्ट नेमकी कोणती, हे तुम्हाला माहिती आहे का...
पाकिस्तानने नाणेफक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत 146 धावांची सलामी दिली. विश्वचषकात तब्बल 23 वर्षांनी पाकिस्तानविरुद्ध एवढी दमदार सलामी पाहायला मिळाली. पाकिस्तानविरुद्ध 1992च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजकडून 175 धावांची सलामी पाहायला मिळाली होती. त्यानंतर 1999 च्या विश्वचषकात इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 147 धावांची सलामी दिली होती. त्यानंतर तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाच्या फिंच आणि वॉर्नर यांचा लागतो.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शतकी सलामी
175* डेस्मंड हेन्स - ब्रायन लारा, मेलबर्न, 1992
147 आर स्मिथ - माइकल आथर्टन, कराची, 1996
146 डेव्हिड वॉर्नर - आरोन फिंच, टॉन्टन, 2019
132 गॉर्डन ग्रीनिज - डेस्मंड हेन्स, ओवल, 1979
115 ग्रीम फ्लावर - क्रिस टावरे, मँचेस्टर, 1983
![]()
वॉर्नरच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला
एकेकाळी ऑस्ट्रेलियाची बिनबाद 146 अशी भक्कम स्थिती होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांचा पल्ला सहज गाठेल, असे म्हटले जात होते. पण शतकवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना 307 धावांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाच बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच आणि वॉर्नर यांनी दमदार फलंदाजी करत 146 धावांची सलामी दिली. फिंच 82 धावांवर आऊट झाला, पण त्यानंतर वॉर्नरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शतक झळकावले. वॉर्नरने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 107 धावांची खेळी साकारली. वॉर्नरबाद झाला तेव्हा 37.5 षटकांत ऑस्ट्रेलियाची 4 बाद 242 अशी धावसंख्या होती. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना साडे तिनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही.