Join us

ICC World Cup 2019 INDvSA : नरेंद्र मोदींनी दिल्या भारतीय संघाला 'या' शुभेच्छा

मोदी यांनी विराटसेनेला नेमक्या काय शुभेच्छा दिल्या त्या आपण पाहूया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 19:58 IST

Open in App

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारताचे पंतप्रधान यांनी भारतीय संघाला विश्वचषाकातील पहिल्या सामन्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी विराटसेनेला नेमक्या काय शुभेच्छा दिल्या त्या आपण पाहूया...

मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी ट्विट केले आहे की, " आजपासून भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या अभियाना सुरुवात होत आहे. माझ्याकडून भारतीय संघांना शुभेच्छा. मला आशा आहे की, ही स्पर्धा खेळासाठी एक चांगले उदाहरण म्हणून पुढे येवो आणि खेळभावनेचा आनंद पाहायाला मिळो. या विश्वचषकात फक्त खेळामध्ये जिंकू नका तर साऱ्यांची मनेही जिंका." मोदी यांच्या ट्विटची दखल बीसीसीआयने घेतली असून त्यांनी या ट्विटला चांगला प्रतिसादही दिला आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय क्रिकेट संघवर्ल्ड कप 2019