Join us

ICC World Cup 2019 : आयसीसीनं त्यांचं काम करावं, धोनीच्या ग्लोव्हज वादावर गंभीरचे मत

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅज चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद आता मिटला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ठाम भूमिकेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 15:48 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅज चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद आता मिटला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ठाम भूमिकेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. आयसीसीच्या पवित्र्यावर धोनी चाहत्यांनी सडकून टीका केली होती आणि अजूनही त्यांचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 जूनला झालेल्या सामन्यात धोनीनं ते ग्लोव्हज घातले होते. सर्व देशवासीय धोनीच्या पाठीशी आहेत आणि आता भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही धोनीची बाजू घेतली आहे. त्याने आयसीसीचे कान टोचले. 

''जगभरात क्रिकेटचा प्रसार कसा होईल याचा आयसीसीनं विचार करावा. कोण कोणता ग्लोव्हज घालतोय, त्यावर कोणता लोगो आहे, हे तुमचं काम नाही,'' अशा शब्दात गंभीरनं आयसीसीला झापलं. नोव्हेंबर 2018 मध्ये गंभीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुक लढवली आणि त्यात त्यानं विजयही मिळवला. 

तो पुढे म्हणाला,''एका सामन्यात 300-400 धावा होता कामा नये याकडे आयसीसीनं लक्ष द्यायला हवं. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या आयसीसीनं तयार करायला हव्यात. प्रत्येकवेळी फलंदाजांना पोषक खेळपट्ट्या असता कामा नये. लोगोचा जो काही वाद निर्माण झाला किंवा केला गेला तो गरजेचा नव्हता.'' 

आयसीसीच्या ठाम भूमिकेनंतर बीसीसीआयनं उचललं 'हे' पाऊलबीसीसीआयनंही एक पाऊल मागे घेताना आयसीसीचे आदेश पाळले जातील हे स्पष्ट केले. प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राज म्हणाले,''आयसीसीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही नियमाविरोधात आम्हाला जायचे नाही. क्रीडा प्रेमी देशातील आम्ही सदस्य आहोत.'' 

...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रियाऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत आपण हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने सांगितले आहे. अशा प्रकारचे ग्लोव्हज वापरल्याने आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर विश्वचषकात हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने बीसीसीआयला सांगितले आहे, असे एका संकेतस्थळाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया

चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

आयसीसीचा धोनीला 'दे धक्का', ग्लोव्हजबाबत घेतलाय निर्णय पक्का

आयसीसीच्या ठाम भूमिकेनंतर बीसीसीआयनं उचललं 'हे' पाऊल 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीर