Join us

ICC World Cup 2019 : आयसीसीच्या ठाम भूमिकेनंतर बीसीसीआयनं उचललं 'हे' पाऊल

ICC World Cup 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) ठाम भूमिकेनंतर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून सुरू वाद मिटेल अशी शक्यता होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 15:44 IST

Open in App

लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) ठाम भूमिकेनंतर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून सुरू वाद मिटेल अशी शक्यता होती. पण, त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. बलिदान बॅजचं चिन्ह असलेल्या ग्लोव्हजवर आक्षेप घेत आयसीसीनं नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे असा आदेश दिला. त्यानुसार धोनीला पुढील सामन्यांत 'बलिदान बॅज'चे चिन्ह असलेले ग्लोव्हज घालता येणार नाही. धोनीनं आयसीसीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, असा पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयनंही आता एक पाऊल मागे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीनं हे ग्लोव्हज घातले होते. सामन्यातील भारतानं विजय मिळवला, परंतु त्याहीपेक्षा या ग्लोव्हजचीच चर्चा अधिक रंगली. धोनीला हे ग्लोव्हज घालण्याची परवानगी मिळावी याकरिता बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय परिषदेला पत्र पाठवलं. धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हामुळे आयसीसीच्या कोणतेही नियम मोडले जात न्सल्याचा बचाव बीसीसीआयनं केला. पण, आयसीसीनं शुक्रवारी बीसीसीआयची ही विनंती फेटाळली. धोनी चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता. नियमांचे उल्लंघन होणार असेल तर हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने स्पष्ट केले आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत आपण हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने सांगितले आहे. अशा प्रकारचे ग्लोव्हज वापरल्याने आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर विश्वचषकात हे ग्लोव्हज मी वापरणार नाही, असे धोनीने बीसीसीआयला सांगितले आहे, असे एका संकेतस्थळाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. बीसीसीआयनंही एक पाऊल मागे घेताना आयसीसीचे आदेश पाळले जातील हे स्पष्ट केले. प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राज म्हणाले,''आयसीसीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही नियमाविरोधात आम्हाला जायचे नाही. क्रीडा प्रेमी देशातील आम्ही सदस्य आहोत.'' 

...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया

चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

आयसीसीचा धोनीला 'दे धक्का', ग्लोव्हजबाबत घेतलाय निर्णय पक्का

टॅग्स :वर्ल्ड कप 2019महेंद्रसिंग धोनीबीसीसीआयआयसीसीद. आफ्रिका