Join us

ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप संघात स्मिथ-वॉर्नरला संधी; कोणाचा पत्ता झाला कट?

ICC World Cup 2019: वॉर्नरच्या पुनरागमनाने सलामीचा पेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 09:31 IST

Open in App

सिडनी, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऑस्ट्रेलियाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात अपेक्षेप्रमाणे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे. चेंडू कुरतडण्याप्रकरणी एका वर्षांची बंदी पूर्ण करून या दोघांनी नुकतेच क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय संघातीलही कमबॅक निश्चित मानले जात होते. या दोघांना वर्ल्ड कप संघात स्थान देताना जोश हेझलवूड आणि पीटर हॅंड्सकोम्ब यांना डच्चू देण्यात आले आहे.

गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या दोन वन डे मालिका ( भारत आणि पाकिस्तान ) जिंकल्या आहेत. त्यात स्मिथ व वॉर्नरच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचे मनोबल अधिक उंचावले आहे. हॅंड्सकोम्बला वगळण्यात आल्याने ऑसी संघ अ‍ॅलेक्स करी या एकाच यष्टिरक्षकासह इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. 

" मागील सहा महिन्यांत ज्या प्रकारे संघ तयार झाला आहे, त्याचे समाधान आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान या संघांविरुद्धच्या मालिका विजयाने खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे," अशी प्रतिक्रिया निवड समितीचे प्रमुख ट्रेव्हर होन्स यांनी दिली. ते पुढे म्हणाले" स्मिथ आणि वॉर्नर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. आयपीएलमध्येही त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे."

ICC World Cup 2019 : नवीन जर्सीसह जेतेपद कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार

सलामीचा तिढानुकत्याच झालेल्या मालिकेत अ‍ॅरोन फिंच आणि उस्मा ख्वाजा यांनी सलामीची जबाबदारी स्वीकारली होती. पण वॉर्नरच्या समावेशामुळे वर्ल्ड कपमध्ये सलामीला कोण येणार याची उत्सुकता आहे. 

शॉन मार्श, स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. अ‍ॅडम झम्पा आणि नॅथन लियॉन या दोन फिरकीपटूंसह पाच जलदगती गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. पॅट कमिन्स आणि २०१५ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील नायक मिचेल स्टार्क यांचे कमबॅक होत आहे. 

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ : अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅलेक्स करी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथनकोल्टर नायल, जेसन बेहरेनडोर्फ, नॅथन लियॉन, अ‍ॅडम झम्पा.

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९आॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर