लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : मोहम्मद शमीला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अखेर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीनं अंतिम अकरामध्ये स्थान पटकावलं. या सामन्यात त्यानं हॅटट्रिक घेत भारताला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं 40 धावांत 4 विकेट्स घेतल्या. 224 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती, परंतु शमीनं त्या षटकात हॅटट्रिक नोंदवली आणि भारताला विजय मिळवून दिला. 1987 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चेतन शर्मा यांनी हॅटट्रिक नोंदवली होती आणि त्यानंतर शमी हा वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
मोहम्मद शमीवर पत्नीने केले बलात्कार आणि खुनाचे आरोप, एफआयआर दाखल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ गेले दोन दिवस शमीवर गंभीर आरोप करत होती. पण शुक्रवारी मात्र हसीनने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात लाल बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. शमीचे बऱ्याच देशांमधील स्त्रीयांबरोबर अनैतिक संबंध आहेत. शमीची पाकिस्तानमध्ये अलिशाबा ही प्रेयसी आहे. दक्षिण आफ्रिकेमधून शमी तिच्याबरोबर दुबईला गेला होता. तिथे दोघांनी काही काळ एकाच रुममध्ये व्यतित केला होता. त्याचबरोबर तिच्याकडून शमीने काही पैसेही घेतले होते. शामी हा देशाची फसवणूक करत आहे, असे आरोप हसीनने केले होते. पण पुराव्यांसह हसीनने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.