ICC Womens World Cup 2025 Where to Watch India Women vs Pakistan Women Live Streaming Details : ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत-पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील दिमाखदार विजयासह यंदाच्या हंगामाची सुरुवात अगदी धमाक्यात केलीये. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाला सलामीच्या लढतीत बांगलादेशच्या संघाने पराभवाचा दणका दिलाय. पाक संघाला पराभवातून सावरणं मुश्किलच आहे. कारण आतापर्यंत भारतीय संघाविरुद्ध ते एकही सामना जिंकलेले नाहीत. चला तर मग इथं एक नजर टाकुयात IND W vs PAK W सामन्याचे Live Streaming अन् दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दलची खास माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC महिला वनडे वर्ल्ड कप 2025 - सहावा सामना (India Women vs Pakistan Women 6th Match)
- तारीख: ५ ऑक्टोबर
- सामन्याचं ठिकाण: आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
- वेळ: दुपारी ३:०० (भारतीय प्रमाणवेळेनुसार – IST)
Richest Women Cricketers: महिला क्रिकेटर्सच्या श्रीमंतीची गोष्ट; टॉप ५ मध्ये ३ भारतीय
भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड (India Women vs Pakistan Women ODIs Head To Head Record)
- एकूण सामने – ११
- भारताचे विजय – ११
- पाकिस्तानचे विजय – ०
IND vs PAK सामना कुठे पाहता येईल?
- टीव्ही प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- निशुल्क लाईव्ह स्ट्रिमिंग: जिओसिनेमा आणि Disney+ Hotstar (मोबाईल, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही आणि वेबवर उपलब्ध)
भारत महिला क्रिकेट संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चारणी, उमा चेत्री (यष्टीरक्षक), स्नेह राणा
पाकिस्तान महिला क्रिकेट संघ:
फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उपकर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, ऐमन फातिमा, नश्रा संधू, नतालिया परवेझ, ओमायमा सुहैल, रमीन शमिम, सदफ शमास, सादिया इक्बाल, शावाल झुल्फिकार, सिद्रा अमिन, सिद्रा नवाझ, सयदा अरूब शाह.
Web Summary : India Women face Pakistan in the World Cup, aiming to continue their winning streak. India has never lost to Pakistan in ODIs. The match will be live on Star Sports and JioCinema.
Web Summary : वर्ल्ड कप में भारत का मुकाबला पाकिस्तान से, जीत की लय बरकरार रखने का लक्ष्य। भारत वनडे में पाकिस्तान से कभी नहीं हारा। मैच स्टार स्पोर्ट्स और जियोसिनेमा पर लाइव होगा।