ICC Womens World Cup 2025, England Women defeat India Women by 4 Runs And Enter Semi Final : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंदूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की ओढावली. १९८२ नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघावर सलग तीन सामने गमावण्याची वेळ आली. स्मृती मानधनासह हरमनप्रीत कौरच्या खेळीसह भारतीय संघाने सामन्यावर पकड मिळवली होती. पण इंग्लंडच्या संघाने भारताच्या तोंडचा घास हिरावून घेत ४ धावांनी सामना जिंकत सेमी फायनलचं तिकीट पक्के केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृतीचं शतक हुकलं अन् तिथंच इंग्लंडला मॅचमध्ये येण्याची संधी मिळाली
इंग्लंडच्या संघानं ठेवलेल्या २८९ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतातीय संघाने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर जोडी जमली. दोघींनी शतकी भागीदारी रचत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. ७० चेंडूत ७० धावा करून हरमनप्रीत कौर बाद झाल्यावर सर्वांच्या नजरा स्मृती मानधनावर खिळल्या होत्या. तिने दीप्तीच्या साथीनं दमदार भागीदारीही रचली. ३१ व्या षटकात स्मृतीनं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अन् ती फसली. ९४ धावांवर ८८ धावांवर ती पॅव्हेलियनमध्ये परतली. तिचे शतक अवघ्या १२ धावांनी हुकले. हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. इथंच इंग्लंडला मॅचमध्ये येण्याची संधी मिळाली.
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
अर्धशतकी खेळीनंतर दीप्तीनं मोक्याच्या क्षणी गमावली विकेट
स्मृती मानधनाची विकेट पडल्यावर मैदानात आलेल्या रिचा घोषला यावेळी फार काळ मैदानात तग धरता आला नाही. ती १० चेंडूत ८ धावा करून माघारी फिरली. अखेरच्या पाच षटकात ४ विकेट हातात असताना दीप्ती शर्मा मैदानात होती. तिने अर्धशतक पूर्ण केल्यावर मॅच फिनिश करण्याची जबाबदाी तिच्यावर होती. पण ती चुकीचा फटका खेळत ४७ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ५७ चेंडूत ५० धावांवर बाद झाली अन् मॅचमध्ये इंग्लंडने आपली पकड आणखी मजबूत केली. शेवटी भारतीय संघ ४ धावांनी कमी पडला. या पराभवानंतरही भारतीय संघ सेमीच्या शर्यतीत टिकून आहे. पण आता उर्वरित प्रत्येक सामना भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. त्यातही २३ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्धची लढत टीम इंडियासाठी अधिक महत्त्वाची असेल.