Join us

ICC Women's T20 World Cup: टीम इंडियाच्या जेतेपदाच्या मार्गात इंग्लंडचा अडथळा

ICC Women's T20 World Cup: महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 16:11 IST

Open in App

ICC Women's T20 World Cup: महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला ब गटातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आफ्रिकेनं ब गटात अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय महिलांसमोर इंग्लंडचे आव्हान असणार असेल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडतील.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2017मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. हिदर नाइटच्या संघानं बाजी मारताना जेतेपद उंचावले होते. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियानं सोमवारी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. त्यांच्यासमोर आफ्रिकेचे आव्हान असेल. आफ्रिकेनं 2014मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलियानं चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे, तर इंग्लंडनं 2009चा पहिलाच वर्ल्ड कप उंचावला आहे.  या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला जागतिक महिला दिनी होणार आहे.

वेळापत्रकभारत विरुद्ध इंग्लंड, 5 मार्च, सकाळी 9.30 वाजल्यापासूनदक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 5 मार्च, दुपारी 1.30 वाजल्यापासून 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतआॅस्ट्रेलियाइंग्लंडद. आफ्रिका