ICC T20I Rankings : ईशान किशनची 'मुंसडी'! सलग दोन वेळा पदरी भोपळा पडूनही अभिषेक शर्माचा 'रुबाब'

ईशान किशनसह तिलक वर्मा फायद्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:25 IST2026-02-18T16:17:25+5:302026-02-18T16:25:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20I Rankings Ishan Kishan High Jumps Abhishek Sharma Remains Number One After Two Duck | ICC T20I Rankings : ईशान किशनची 'मुंसडी'! सलग दोन वेळा पदरी भोपळा पडूनही अभिषेक शर्माचा 'रुबाब'

ICC T20I Rankings : ईशान किशनची 'मुंसडी'! सलग दोन वेळा पदरी भोपळा पडूनही अभिषेक शर्माचा 'रुबाब'

भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील दोन्ही सामन्यात खातेही उघडू शकला नाही. याचा ICC टी-२० क्रमवारीतील त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये घट झाली आहे. पण अजूनही तो अव्वलस्थानी विराजमान आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उर्वरित सामन्यात धमाकेदार कामगिरीसह त्याच्यासमोर 'नंबर वन' स्थान भक्कम करण्याचे चॅलेंज असेल. दुसऱ्या बाजूला ईशान किशन याने धमाकेदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीसी टी-२० मधील फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इथं जाणून घेऊयात ICC च्या टी-२० क्रमवारीत कुणाला किती फायदा झाला आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अभिषेक शर्मा अव्वलस्थानी कायम!

आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत अभिषेक शर्मा ८९१ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्टचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ८०८ रेटिंग पॉइंट्स आहेत. अभिषेक शर्मा टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासह पाकिस्तानविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. 

T20 World Cup 2026: गर्वाचे घर खाली.. ऑस्ट्रेलियाचं 'पॅक-अप', कॅप्टनचा जुना फोटो VIRAL

ईशान किशनसह तिलक वर्मा फायद्यात

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ७७ धावांची धमाकेदार खेळी केल्यावर ईशान किशनने क्रमवारीत १७ स्थानांनी सुधारणा केली आहे. तो आता आठव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. सध्या त्याच्या खात्यात ७३२ रेटिंग पॉइंट्स जमा झाले असून सातत्यपूर्ण कामगिरीसह तो क्रमवारीतील आपले स्थान आणखी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७५१ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी तो पाचव्या क्रमांकावर होता. वर्ल्ड कपमध्ये मोठी खेळी नसली तरी छोट्या पण महत्त्वाच्या डावांमुळे त्याला फायदा झाला आहे.

पथुम निसंकाची मोठी झेप

श्रीलंकेचा स्टार फलंदाज पथुम निसंका याने (Pathum Nissanka) आयसीसी टी २० क्रमवारीत मुसंडी मारली आहे.  तो ३ स्थानांच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात ७८६ रेटिंग पॉइंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शतकी खेळाचा त्याला मोठा फायदा झाला आहे.

Web Title : ICC T20I रैंकिंग: ईशान किशन की छलांग; शर्मा अभी भी शीर्ष पर!

Web Summary : दो बार शून्य पर आउट होने के बावजूद, अभिषेक शर्मा ICC T20I रैंकिंग में शीर्ष पर हैं। ईशान किशन एक मजबूत पारी के बाद 17 स्थान ऊपर चढ़े, जबकि पथुम निसांका भी आगे बढ़े। तिलक वर्मा को लगातार प्रदर्शन का फायदा हुआ।

Web Title : ICC T20I Rankings: Kishan Jumps; Sharma Still Top Despite Ducks!

Web Summary : Despite two ducks, Abhishek Sharma tops ICC T20I rankings. Ishan Kishan jumps 17 spots after a strong innings, while Pathum Nissanka also rises. Tilak Varma benefits from consistent performance.