Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक सामन्यानंतरचा तणाव संपला! सूर्या-कुलदीपची ‘हेरा फेरी’ चर्चेत (VIDEO)

पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाच्या ताफ्यातील वातावरण बिघडल्याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:02 IST

Open in App

Suryakumar Yadav Quells Kuldeep Yadav Controversy Post Pakistan Match  : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले होेते. या गोष्टीवरुन उलट सुलट रंगणाऱ्या चर्चेवर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एका खास व्हिडिओसह पूर्ण विराम दिला आहे. सूर्या दादानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो कुलदीपचा रुसवा काढताना दिसतो. दुसरीकडे कुलदीप यावद भाव खाताना पाहायला मिळते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सूर्यकुमार यादवनं शेअर केला खास व्हिडिओ 

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने (Suryakumar Yadav) याने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सोबत दिसत आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या गॅलरीत शूट करण्यात आला असून दोघेही 'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) या चित्रपटातील डायलॉगवर अभिनय करताना दिसतात. व्हिडिओमध्ये असे दिसते की, गॅलरीत समोरासमोर येताना सूर्याकुमार यादव कुलदीपशी हस्तांदोलन करत त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र कुलदीप त्याकडे दुर्लक्ष करत नाराज असल्याचा अभिनय करतो आणि पुढे निघून जातो.

IND vs AUS: टीम इंडियासाठी गूड न्यूज, चार महिन्यानंतर विस्फोटक फलंदाजाचं संघात कमबॅक!

पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाच्या ताफ्यातील वातावरण बिघडल्याची चर्चा

१५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात कुलदीप यादवकडून शेवटच्या षटकात सीमारेषेजवळ एक सोपा झेल सुटला होता. त्यानंतर आधी गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याने त्याच्यावर राग काढला. सामना संपल्यावर हस्तांदोलनाच्या वेळी सूर्यकुमार यादवही त्याच्यावर चिडल्याचे पाहायला मिळाले होते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यांच्यातील तणावपूर्ण वातावरण दाखवणारे चित्र दिसून आले. हस्तांदोलनाच्या वेळी कर्णधार फिरकीपटूवर चिडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर टीम इंडियाच्या ताफ्यातील वातावरण ठिक नाही,  अशी चर्चा रंगू लागली. पण सूर्यकुमार यादव याने 'हेरा फेरी..'च्या डायलॉगसह शेअर केलेल्या खास व्हिडिओसह हा विषय संपवला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Surya Kuldeep: A Focus on the Names Surya and Kuldeep

Web Summary : The article simply repeats the names 'Surya Kuldeep', indicating perhaps a focus on these two names and their potential significance. It is brief and lacks further context.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवकुलदीप यादव