ICC T20 World Cup Super 8s Scenario West Indies Secure Super 8 Spot : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'क' गटात वेस्ट इंडिजच्या संघाने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात विजयी हॅटट्रिक साजरी केली. या सामन्यातील विजयासह वेस्ट इंडिज यंदाच्या हंगामातील सुपर ८ मध्ये पोहचणारा दुसरा संघ ठरला आहे. या गटात इंग्लंडचा संघ ३ सामन्यातील विजयासह ४ गुण कमावत दुसऱ्या स्थानावर असून स्कॉटलंड आणि इटलीचा संघ प्रत्येकी २-२ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. या गटातील नेपाळचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला असून इंग्लंडच्या संघाला अखेरचा सामना जिंकून आपली जागा पक्की करण्याची संधी आहे. याशिवाय स्कॉटलंड आणि इटली अजूनही स्पर्धेत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीनंतर मिळणार तिसरा संघ
'अ' गटात भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुर्चित सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी या गटातून प्रत्येकी २-२ सामने जिंकले असून सलग तिसऱ्या विजयासह या गटातून सुपर ८ मधील दुसरा संघ मिळणार आहे. भारत-पाक सामन्यावर पावसाचेही सावट आहे. जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. या परिस्थितीत दोन्ही संघ एकाच वेळी सुपर ८ साठी पात्र ठरतील. दुसरीकडे या गटातील तिन्ही संघ एकाच वेळी स्पर्धेतून बाद ठरतील.
कोलंबोत आज पाऊस पडला तर काय? सामना राखीव दिवशी होणार की..,ICCचा तो नियम वाचून तुम्हाला बसेल धक्का
'ब' गटात तिरंगी लढत, 'ड' गटातील दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये पोहचणारी ठरली पहिली टीम 'ड' गटातून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलग तीन विजयासह सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले होते. या गटातून न्यूझीलंड संघ दुसरा दावेदार आहे. यासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकायचा आहे. 'ब' गटात मात्र सगळ्यात तगडी स्पर्धा आहे. यजमान श्रीलंका, झिम्ब्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी लढती निर्माण झाली असून फायनल बाजी कोण मारणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : West Indies secured a Super 8 spot in the T20 World Cup. India-Pakistan match crucial; rain could qualify both. South Africa already in Super 8. Tight race in Group B.
Web Summary : वेस्ट इंडीज ने टी20 विश्व कप में सुपर 8 में जगह बनाई। भारत-पाक मैच महत्वपूर्ण; बारिश होने पर दोनों क्वालीफाई कर सकते हैं। दक्षिण अफ्रीका पहले से ही सुपर 8 में। ग्रुप बी में कड़ी टक्कर।