Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : लुंगी एन्गिडीच्या 'रिस्ट बँड'वरून अंपायरशी पंगा घेणं पडलं महागात; ICC नं नबीच्या खिशाला लावली कात्री

मोहम्मद नबीवर ICC ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:47 IST

Open in App

ICC T20 World Cup SA vs AFG Mohammad Nabi Fined For ICC  : टी-२० वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात कल्पनेपलिकडचा थरार रंगला. दोन सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या लढतीत अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला रोखत नाट्यमय विजय मिळवला. मात्र या पराभवानंतर अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी याच्यावर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. अनुभवी खेळाडूवर नेमकी का आणि काय कारवाई झाली? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मोहम्मद नबीवर ICC ची कारवाई

अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं  सामना शुल्काच्या १५ टक्के रक्कम कपात करण्याचा  दंड ठोठावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील 'ड'  सामन्यात आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. नबी याने आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसंदर्भातील आचारसंहितेतील कलम २.४ चे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या सूचनांचे पालन न करणे, असा या कलमाचा संबंध आहे.

T20 World Cup : SA vs AFG यांच्यातील 'सुपर मॅच'मध्ये 'रिस्टबँड'वरून राडा? नेमकं काय घडलं?

नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

दोन सुपर ओव्हरच्या थरार पाहायला मिळण्याआधी अफगाणिस्तानच्या डावातील १४व्या षटकात मैदानात उतरल्यावर मोहम्मद नबी अंपायरसोबत हुज्जत घालताना दिसला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी दोन्ही हातांना रिस्ट बँड (Wrist Band) घालून गोलंदाजी करत होता. नबीने यावर नाराजी व्यक्त करताना पंचांशी वाद घातल्याचे पाहायला मिळाले होते. नबीच्या आक्षेपानंतर पंचांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला गोलंदाजी करत असलेल्या हातातील व्हाइट रिस्ट बँड काढून गोलंदाजी करण्याच्या सूचना केल्या. त्यानेही पंचाचे ऐकले. हे सगळं घडण्याआधी नबीचं मैदानातील पंचाशी केलेले वर्तन हे अयोग्य होते. याचीच किंमत त्याला दंडात्मक कारवाईच्या रुपात मोजावी लागली.

मोहम्मद नबीवर खेळलेला डाव फसला अन् अफगाणिस्तानने रोमहर्षक विजयाची संधी गमावली

मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्याला धमक दाखवता आली नाही. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये २४ धावांचे टार्गेट मिळाल्यावर कर्णधार राशिद खान आणि अफगाणिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने नबीवर मोठा डाव खेळला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये त्यानेच संघाच्या डावाची सुरुवात केली. पण तो एक चेंडू निर्धाव खेळून दुसऱ्या चेंडूवरच बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या गुरबाझनं सलग तीन षटकार मारून सामन्यात पुन्हा ट्विस्ट आणले. पण शेवटी अफगाणिस्तानचा संघ या सुपर ओव्हरमध्ये ५ धावांनी कमी पडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Nabi fined for arguing with umpire over Ngidi's wristband in T20 WC.

Web Summary : Mohammad Nabi was fined 15% of his match fee for arguing with the umpire about Lungi Ngidi's wristbands during the Afghanistan vs. South Africa T20 World Cup match. His actions violated ICC's code of conduct.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६आयसीसीद. आफ्रिकाअफगाणिस्तान