T20 World Cup : SA vs AFG यांच्यातील 'सुपर मॅच'मध्ये 'रिस्टबँड'वरून राडा? नेमकं काय घडलं?

नबीनं मैदानात उतरल्यावर चेंडूचा सामना करण्याआधी पंचासोबत हुज्जत घातली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:57 IST2026-02-11T16:52:28+5:302026-02-11T16:57:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup SA vs AFG 13th Match A Heated Argument Between Mohammad Nabi And Umpire Because Of Lungi Ngidi’s Hand Bands | T20 World Cup : SA vs AFG यांच्यातील 'सुपर मॅच'मध्ये 'रिस्टबँड'वरून राडा? नेमकं काय घडलं?

T20 World Cup : SA vs AFG यांच्यातील 'सुपर मॅच'मध्ये 'रिस्टबँड'वरून राडा? नेमकं काय घडलं?

South Africa vs Afghanistan, 13th Mat : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. दोन सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळण्याआधी मोहम्मद नबी आणि अंपायर यांच्यात मैदानात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एनिगडीचा सामना करण्याआधी तो अंपारसोबत कोणत्यातरी मुद्यावरून वादच घालत आहे, असे चित्र निर्माण झाले होते. शेवटी त्याला जे हवे होते ते झालं, पण मनासारखी गोष्ट घडल्यावरही त्याची खेळी काही बहरली नाही. त्याचा अफगाणिस्तानला मोठा फटकाही बसला. मैदानात नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नबीनं मैदानात उतरल्यावर चेंडूचा सामना करण्याआधी पंचासोबत हुज्जत घातली?

१३ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ओमरझाईच्या रुपात अफगाणिस्तानला १२४ धावांवर पाचवा धक्का बसला. तो बाद झाल्यावर अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी फलंदाजीसाठी आला. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने हुकमी एक्का ठरत असलेल्या लुंगी एनिगडीच्या हाती चेंडू सोपवला. रनअपसाठी गेला असतानाच मोहम्मद नबी अंपायरकडे गेला. तो पंचासोबत हुज्जत घालत आहे, असे चित्र पाहायला मिळाले.

SA vs AFG : ट्विस्टवर ट्विस्ट! विजयी धाव घेताना फ्री हिटवर रनआउट अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला

जाणून घ्या मैदानात नेमकं काय घडलं?



दक्षिण आफ्रिकेचा स्टार जलदगती गोलंदाज लुंगी एनिगडी या सामन्यात दोन्ही हाताला रिस्टब्रँड घालून गोलंदाजी करताना दिसला. पण नबी मैदानात आल्यावर त्याने मैदानातील पंचाकडे जात दक्षिण आफ्रिकेच्या  गोलंदाजाने  रिस्टबँड काढून गोलंदाजी करावी, अशी विनंती केली. अंपायरनेही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला तशी सुचना केली आणि त्यानेही लगेच ज्या हाताने गोलंदाजी करणार त्या  हातातील रिस्टब्रँड काढून गोलंदाजी केली. व्हाइट रिस्ट ब्रँडमुळे लक्षविचलित होऊन नये, यासाठी नबीनं खबरदारी घेतली. पण तो संघाला विजय मिळवून देणारी कामगिरी करून शकला नाही. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये त्याला डावाची सुरुवात करण्याच संधी मिळाली. पण तो दोन निर्धाव चेंडू खेळून शून्यावर माघारी फिरला. ज्यामुळे संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. दुसरीकडे लुंगी एनिगडी दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेत विजयाचा हिरो ठरला.

Web Title : टी20 विश्व कप: SA vs AFG सुपर मैच में रिस्टबैंड पर विवाद?

Web Summary : SA vs AFG मैच के दौरान, मोहम्मद नबी ने लुंगी एनगिडी के रिस्टबैंड को लेकर अंपायर से बहस की। नबी ने ध्यान भंग से बचने के लिए इसे हटाने का अनुरोध किया। इसके बावजूद, अफगानिस्तान हार गया, और एनगिडी 3 विकेट लेकर चमके।

Web Title : T20 World Cup: Wristband controversy in SA vs AFG Super Match?

Web Summary : During the SA vs AFG match, Mohammad Nabi argued with the umpire about Lungi Ngidi's wristband. Nabi requested Ngidi remove it to avoid distraction. Despite this, Afghanistan lost, and Ngidi starred with 3 wickets.