टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला अखेरच्या षटकात १ विकेट हाती असताना अफगाणिस्तानच्या संघाला १३ धावांची गरज होती. कगिसो रबाडा शेवटचे षटक घेऊन आला. पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. पण हा नो बॉल ठरला. याचा फायदा उठवत नूरनं अफगाणिस्तान संघाला मॅचमध्ये आणलं. तीन चेंडूनंतर रबाडाने पुन्हा नो बॉल टाकला. अखेरच्या ३ चेंडूत २ धावांची गरज असताना आणि फ्री हीट असताना अफगाणिस्तानच्या संघाने दुसरी धाव घेताना विकेट गमावली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्येही सामना टाय अन्...
सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने १७ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर १८ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा बचाव करण्यासाठी राशिद खान याने फारुकीच्या हाती चेंडू सोपवला. एक विकेट घेत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अडचणीत आणले होते. पण पुन्हा सुपर ओव्हरमध्ये आणखी एक ट्विस्ट आले. अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना स्टब्सनं षटकार मारला आणि सुपर ओव्हरमध्ये टाय़ झाला. अन् एका सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरचा थरार सेट झाला.
Web Summary : South Africa vs Afghanistan T20 World Cup match went to a Super Over. Afghanistan needed 13 runs in the last over with one wicket left, but multiple no-balls and a run-out on a free hit led to the tie.
Web Summary : दक्षिण अफ्रीका बनाम अफगानिस्तान टी20 विश्व कप मैच सुपर ओवर में गया। अफगानिस्तान को आखिरी ओवर में 1 विकेट के साथ 13 रनों की जरूरत थी, लेकिन कई नो-बॉल और फ्री हिट पर रन-आउट के कारण मैच टाई हो गया।