पाकिस्तानही बांगलादेशच्या वाटेवर? भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेणार?

ICC T20 World Cup: बांगलादेशला आगामी टी-२० विश्वचषकातून वगळण्यात आल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली. पाक संघाच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल, असे त्यांनी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:28 IST2026-01-25T09:16:43+5:302026-01-25T09:28:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup: Is Pakistan also on the path to Bangladesh? | पाकिस्तानही बांगलादेशच्या वाटेवर? भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेणार?

पाकिस्तानही बांगलादेशच्या वाटेवर? भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेणार?

लाहोर - बांगलादेशला आगामी टी-२० विश्वचषकातून वगळण्यात आल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली. पाक संघाच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल, असे त्यांनी जाहीर केले. नकवी म्हणाले की, हा विषय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर मांडला जाईल. पंतप्रधान सध्या देशाबाहेर असून, ते परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.

नकवी म्हणाले, ‘आम्ही टी-२० विश्वचषक खेळायचा की नाही, हे सरकार ठरवेल. पंतप्रधान परतल्यावर आम्ही त्यांचा सल्ला घेऊ. सरकारचा निर्णय हा अंतिम आणि आमच्यासाठी बंधनकारक असेल. जर सरकारने आम्हाला ‘नकार’ दिला, तर आयसीसी दुसऱ्या कोणत्याही संघाला आमंत्रित करू शकते.’

आयसीसीच्या बैठकीत बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याच्या मागणीला पाठिंबा देणारा पाकिस्तान हा एकमेव देश होता, तर इतर १४ सदस्य देशांनी याविरोधात मतदान केले. यावर भाष्य करताना नकवी म्हणाले, ‘बांगलादेश हा जागतिक क्रिकेटमधील एक मोठा भागधारक आहे आणि या प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्या या परिस्थितीमागे अनेक कारणे आहेत, जी वेळ आल्यावर मी उघड करीन.’

जागतिक क्रिकेट संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नकवी यांनी आरोप केला की, एक सदस्य देश नकारात्मक प्रभाव टाकत आहे. ते म्हणाले, ‘एक देश निर्णय लादत आहे. जेव्हा पाकिस्तान आणि भारतासाठी ठिकाण बदलून सुविधा दिली गेली, तेव्हा बांगलादेशसाठी तसे का केले नाही? आमचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही आयसीसीच्या अधीन नसून आपल्या सरकारला उत्तरदायी आहोत.’

Web Title : क्या पाकिस्तान भारत में टी20 विश्व कप का बहिष्कार करेगा?

Web Summary : पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी ने कहा कि टी20 विश्व कप में पाकिस्तान की भागीदारी सरकार की मंजूरी पर निर्भर है। उन्होंने आईसीसी के फैसलों की आलोचना करते हुए बांग्लादेश के प्रति अन्याय और एक देश के अनुचित प्रभाव का आरोप लगाया। अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार का होगा।

Web Title : Pakistan May Boycott T20 World Cup in India?

Web Summary : PCB Chairman Mohsin Naqvi stated Pakistan's participation in the T20 World Cup depends on government approval. He criticized ICC decision-making, alleging unfair treatment towards Bangladesh and a single country's undue influence. The final decision rests with the Pakistani government.