ICC T20 World Cup AUS vs IRE : एलिसची गती अन् झाम्पाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियन संघाकडून झाम्पा आणि नेथन एलिस यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:44 IST2026-02-11T18:42:17+5:302026-02-11T18:44:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup AUS vs IRE 14th Match Australia Won By 67 Runs vs Ireland Nathan Ellis And Adam Zampa Shine | ICC T20 World Cup AUS vs IRE : एलिसची गती अन् झाम्पाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

ICC T20 World Cup AUS vs IRE : एलिसची गती अन् झाम्पाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

ICC T20 World Cup AUS vs IRE 14th Match : नेथन एलिसचा भेदक मारा आणि ॲडम झाम्पाच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने ऑयर्लंडला ६७ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामात विजय सलामी दिली आहे. मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ट्रॅविस हेडच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १८२ धावा करत आयर्लंडसमोर १८३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १६.५ षटकात ११५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन संघाकडून झाम्पा आणि नेथन एलिस यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नेथन एलिसच्या भेदक माऱ्यासह झाम्पाच्या जाळ्यात फसली आयर्लंडची टीम 

ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या १८३ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग पहिला चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट झाला. सेनापतीनं मैदान सोडल्यावर आयर्लंडची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. एलिसचा भेदक मारा आणि झामाच्या फिरकीसमोर आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आयर्लंडचा संघ शंभरीच्या आतच आटोपेल, असे वाटत होते. पण तळाच्या फलंदाजीत जॉर्ज डॉकेल याने २९ चेंडूत केलेल्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी ११५ धावांपर्यंत मजल मारल्या.  ऑस्ट्रेलियाकडून झाम्पानं ४ षटकात २३ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय नेथन एलिस याने ३.५ षटकात फक्त १२ धावा खर्च करून ४ विकेट्सचा डाव साधला. या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.  २०११ नंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क या स्टार गोलंदाजाशिवाय मैदानात उतरला आहे. यांची उणीव भरून काढण्याची मोठी जबाबदारी नेथन एलिसवर आहे. पहिल्या सामन्यात त्याने ही भूमिका पार पाडण्यासाठी तयार आहे, याची झलक दाखवून दिली आहे.

T20 World Cup : SA vs AFG यांच्यातील 'सुपर मॅच'मध्ये 'रिस्टबँड'वरून राडा? नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियनं संघाच्या डावात एकालाही झळकवता आले नाही अर्धशतक, पण...

कार्यवाहू कर्णधार ट्रॅविस हेडनं आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आपला हा निर्णय सार्थ ठरवण्यात तो कमी पडला. ७ चेंडूत फक्त  धावा करून तो माघारी फिरला. जॉश इंग्लिस याने १७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं  ३७ धावांची दमदार खेळी केली. अखेरच्या षटकात मार्कस स़्टॉयनिसनं २९ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने संघासाठी ४५ धावांची उपयुक्त खेळी केली. एकाही फलंदाजाला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नसली तरी  ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा बचाव करताना कांगारुंच्या संघाने ६७ धावांनी विजय नोंदवला,

Web Title : ऑस्ट्रेलिया की आयरलैंड पर टी20 विश्व कप में एलिस, ज़म्पा के साथ शानदार जीत।

Web Summary : ऑस्ट्रेलिया ने टी20 विश्व कप में आयरलैंड को 67 रनों से हराया, जिसका श्रेय नाथन एलिस और एडम ज़म्पा की गेंदबाजी को जाता है। ऑस्ट्रेलिया ने 183 का लक्ष्य रखा, जिसका पीछा करने में आयरलैंड विफल रहा और 115 रनों पर ऑल आउट हो गया। एलिस और ज़म्पा ने चार-चार विकेट लिए।

Web Title : Australia Dominates Ireland in T20 World Cup Opener with Ellis, Zampa.

Web Summary : Australia defeated Ireland by 67 runs in the T20 World Cup, thanks to Nathan Ellis and Adam Zampa's bowling. Australia set a target of 183, which Ireland failed to chase, getting all out for 115. Ellis and Zampa took four wickets each.